पेट्रोल डिझेल गॅस व खताच्या वाढत्या किमती कमी करण्याचे औसा काँग्रेस कमिटीचे निवेदन
बि. जी. शेख
औसा: दि.१८ - मागील एक वर्षापासून कोरोना आजाराने देशात थैमान घातले असून यामुळे सर्वसामान्य नागरिक भरडून निघाला आहे. या परिस्थितीमध्ये शासनाने पेट्रोल, डिझेल,गॅस व खताच्या किमती वाढल्या आहेत. या वाढलेल्या किमती शासनाने मागे घ्याव्यात या आशयाचे निवेदन औसा काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारा मार्फत पंतप्रधान यांना देण्यात आले. सद्यस्थितीमध्ये व्यापारी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे अर्थचक्र बंद झाले असून नागरिक मोठ्या संकटाचा सामना करीत आहेत. या परिस्थितीमध्ये केंद्र शासनाने पेट्रोल डिझेल गॅस व खताच्या वाढलेल्या किमती यामुळे त्यांच्या होणाऱ्या त्रासामध्ये भर पडली आहे. म्हणून शासनाने या वाढीव किंमती कमी कराव्यात व सर्व सामान्य नागरिकांना योग्य न्याय द्यावा असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर औसा तालुका अध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी शहराध्यक्ष शेख शकील खुनमीर मुल्ला एडवोकेट शहनवाज पटेल, मंजुषा हजारे ,सुधीर पोतदार ,वहीद कुरेशी, अंगद कांबळे, समीउद्दीन पटेल, खैरात शेख, माजिद काजी, मुजम्मिल शेख, अल्ताफ देशमुख, सय्यद हमीद, गुलाब शेख, हमीद सर , नियमत हन्नुरे, जहिरोद्दीन सावकार, नियामत अल्लुरे, नंदकुमार सुरवसे,न्यामत लोहारे, फक्रुद्दीन सावकार इत्यादींच्या स्वाक्षर्या आहेत.

0 Comments