गरिबांची फोडणी झाली महाग;गोडतेलेचे भाव 150 ते 160 भावाने सरास विक्री गोरगरिब जनतेचे कंबरडे मोडले
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) लॉकडाऊनच्या काळात गोडतेलाचे भावा मध्ये वाढ झाल्यामुळे गोरगरिब जनतेला मोठ्या आडचणीचा सामना करावा लागत आहे.कोरोना महामारी वाढत असताना. लाखो लोक कोरोना महामारीचा सामना करीत असताना.आज पैसे कमावण्यासाठी गुंणवतुकदार मोठ्या प्रमाणात पैसा कमावत असल्याचे चिञ दिसत आहे. आज कोरोना महामारी पेक्षा दुसरी आर्थिक महागाई मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे गोरगरिब जनतेचे जीवन जगणे असह्य आहे. घरगुती गॕस सिलिंडर 858-900 भावाने विक्री,पेट्रोल दर 100 जवळ भावाने विक्री, गोडतेल 145- 160 भावाने विक्री,दाळचे दर वाढले असुन कोरोना महामारी माणसाला एकदाच मारते. पण महागाईचा कोरोना रोग माणसाला प्रत्येक दिवसाला मारत असताना. दिसत आहे याकडे शासनाचे लक्ष देणे गरजेचे आहे. यावर शासनाने याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.तर कोरोना महामारीच्या काळात किराणा मालाच्या दरात वाढ झाल्याने गोरगरिब जनतेला खाद्य तेल खरेदी करायला गोडतेल 1किलो खरेदीला 145 ते 150 रुपये खर्च करावा लागत असल्याने कोरोना काळात गोरगरिब जनतेला जनतेला दररोज दिवसाला कमीतकमी 300 रुपये खर्च आहे. मग एक वस्तू जी दररोज खावी लागते.भाजी पोळी साठी खाद्य तेल खरेदी करायचे असेल तर 145 ते 150 रुपये खर्च करून घ्यावे लागते.मग सांगा बाकी वस्तू खरेदी कशा करांयच्या जनतेची व्यथा शासन दरबारी मांडु कशी कोण अमचा विचार करणार गोरगरिब जनतेला खाद्य तेल बेभावाने घ्यावे लागत असल्याने जनता हैराण झाली आहे. चाकुर तालुक्यात व शहरातही चढ्या भावाने खाद्य तेल व किराणा मालाची विक्री होत आहे असे जनतेतुन सध्या सुर निघत आहे.

0 Comments