Latest News

6/recent/ticker-posts

लवकरात लवकर नळ कनेक्शन द्या अन्यथा निलंगा नगरपालिकेला टाळे ठोकू आंदोलन करणार- मुजीब सौदागर

लवकरात लवकर नळ कनेक्शन द्या अन्यथा निलंगा नगरपालिकेला टाळे ठोकू आंदोलन करणार- मुजीब सौदागर


वसीम मुजावर

निलंगा: शहरांमध्ये मागील अनेक महिन्यांपासून पाण्याची भटकंती सुरू आहे शहराला चोवीस तास पाणी देण्याच्या मुद्द्यावरून जुने कनेक्शन बंद केले जात आहे व नवीन कनेक्शन साठी शक्ती करून पैसे वसूल करण्याचा डाव आखला जात आहे परंतु तेही अद्याप सुरू झालेले नसल्याने शेरे हिंद टिपू सुलतान संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर यांनी आज मंगळवारी फेसबूक वरती निलंगा नगरपालिकेला निशाणा साधत म्हटले आहे की साळे गल्ली, माळी गल्ली या प्रभागांमध्ये मागील अनेक महिन्यापासून पाणीपुरवठा बंदच आहे व नवीन नळ कनेक्शन देतो म्हणून अनेक भागातील रस्ते खोदून ठेवले आहेत त्याची दुरुस्ती आणखी राहिलेली असून आणखीन नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे ही अतिशय निंदनीय बाब आहे. मुख्याधिकारी नगराध्यक्षांनी याकडे वेळीच लक्ष देऊन शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत करावा अन्यथा नगरपरिषदेला टाळे ठोका आंदोलन करणार अशी खडक भूमिका घेत फेसबुक वरती निलंगा नगरपालिकेला चांगलेच धारेवर धरले आहे.

Post a Comment

0 Comments