Latest News

6/recent/ticker-posts

जिल्हा बँक सुरु होण्यापूर्वी गर्दी; भादा येथील प्रकार

जिल्हा बँक सुरु होण्यापूर्वी गर्दी; भादा येथील प्रकार


बालाजी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंक शाखा भादा येथे बँक सुरु होण्यापूर्वी उन्हाची तमा न बाळगता अशी गर्दी करण्यात आली होती. सध्या कोरूना मामारी मामारी मुळे शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करण्यासाठी नागरिकांना सात प्रतिबंध अधिनियम कायद्यानुसार नागरिकांनी शासकीय नियम पाळणे बंधनकारक केले आहे. यामुळे सतत चार ते पाच दिवस बँकांना सुट्टी होती यामुळे नागरिकांनी ग्रामीण भागात एटीएम सुविधा नसल्याने आणि मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर यांचे खाते  याच बँकमध्ये असल्याने त्यांचा संपूर्ण व्यवहार याच बँकेमार्फत होतो. यामुळे ग्रामीण सशक्तीकरण आणि आर्थिक मजबुतीकरणासाठी शेतकऱ्यांची बँक म्हणून या जी म बँकेकडे पाहिले जाते. यामुळे सतत चार ते पाच दिवस सुट्टी असल्याने आणि शनिवार दिनांक 15 मे 2021रोजी "वर्किंग डे"असल्याने बँक उघडण्यापूर्वी भादा शाखेसमोर अशी गर्दी जमली होती.

Post a Comment

0 Comments