Latest News

6/recent/ticker-posts

पैसे का मागीतले म्हणून साल गडयाचा केला खून

पैसे का मागीतले म्हणून साल गडयाचा केला खून 



शेख बी जी

औसा: तालुक्यातील मौजे बोरफळ येथे पैसे का मागीतले म्हणून एकाचा खून करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी की गोविंद राम यादव वय ३८ असे मयताचे नाव आहे. मयत गोविंद याने नोकरीचे पैसे चुलत्यास का मागितले म्हणून नितीन सुगावे याने गोविंद यास बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी विकास यादव यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपिस पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरुद्ध 302 नुसार खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी भेट दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन गायकवाड व पो.हे.काॅ.यादव पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments