Latest News

6/recent/ticker-posts

नगराध्यक्ष अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त दुसर्‍यांदा अन्नधान्याचे वाटप

नगराध्यक्ष अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त दुसर्‍यांदा अन्नधान्याचे वाटप


शेख बी जी

औसा: शहरात कोरोनाच्या महामारीमुळे गोरगरीब लोकांच्या अन्न धान्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. मागील दोन महिन्यापासुन काम नसल्यामुळे गरीब कुटुबांवर उपासमारीचे वेळ आली होती. विधवा, निराधार, भुमिहीन, शेतमजुर, मजुर, दिव्यांग, मोलमजुरी करणारे अशा अत्यंत गरजुवंत लोकांना औसा शहरात किराणा वस्तुचे किट वाटप करण्यात आले. लोकनियुक्त नगराध्यक्ष अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त यापूर्वीही अन्नधान्याचे वाटप करण्यात आले होते. त्याचाच भाग म्हणून या दुसऱ्या टप्प्यातही त्यांनी गरजुवंताना किटचे वाटप डॉ.अफसर शेख यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये वाटप करण्यात आले. यावेळी अफसर युवा मंचाचे सर्व सदस्य उपस्थित होते. औसा शहरामध्ये सर्वात जास्त उपेक्षित व दुर्लक्षित असलेल्या गरीब महिला व त्यांच्या कुटुबियाना सध्याच्या महाभयंकर कोरोना कलाखंडात उपासमारीची वेळ आली होती अफसर युवा मंचच्या माध्यमातून या सर्व कुटुंबियाना घरपोच आन्नधान्याचे किटचे वाटप केले. या आन्नधान्याच्या कीट मध्ये तांदुळ, गव्हाचे पिट, गोडेतेल  साहित्य होते. याप्रसंगी अफसर शेख  यांनी औसा शहरात कोठेही गरजु कुटुंबास अन्नाधान्याचे किट सह ईतर मदतीची आवश्यकता असल्यास अफसर युवा मंचा व्दारे केली जाईल असे सांगितले. अफसर युवा मंचच्या माध्यमातून महिला व गरिबांची सेवा आणि मदत मोठ्या प्रमाणात करत असतात. त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. औसा शहरात गरजुवंताना किट वाटप केल्यामुळे लोकांनी या सामाजिक उपक्रमाबदल समाधान व्यक्त केले आहे. अत्यंत गरजुवंत व ज्यांना या किटची आवश्यकता आहे अशाना किट वाटप करण्यात आले. यावेळी औसा शहरातील  सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments