नळेगाव येथे खरीप पेराणीपूर्व मशागत अंतिम टप्प्यात
नळेगाव:{ प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे } निसर्ग अन् कोरोनाच्या संकटालाही न घाबरता तसेच सरकारकडून उत्पादित मालाला हमीभाव न मिळताही आगामी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. खरिपाचे पेराणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. दरम्यान,कोरोना संकटातही शेतकरी बी बियाणे, खतांची जुळवाजुळव करताना दिसत आहे.जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य किंमतीत बी बियाणे, खते वेळेत उपलब्ध करून द्यावीत तसेच त्यांच्या उत्पादित मालाला हमीभाव द्यावा एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे. गतवर्षी कोरोनामुळे उत्पादित शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले होते. 2020 ची खरीपातील पिके काढणीला आल्यावर परतीच्या पावसाने पिके आडवी केली. त्या नुकसाणीतून सावरतो न सावरतो तोच त्याचीच पुनरावृत्ती वादळी वारे अन अवकाळी पाऊसाने रब्बी हंगामातहि केली होती. रब्बीत काढणीला आलेली पिके वाया जाऊ लागल्याने ऐन उन्हाळ्यात शेतकरी चांगलाच गारठून गेला होता. ऐन सुगीतच अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याने डौलदार पिकांना गाठल्याने ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांसह द्राक्ष, आंबा बागांचीही मोठी हानी झाली होती. दरम्यान पाऊस असून आणि नसूनही प्रत्येक वर्ष निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिक दृष्ट्या अडचणीत ठरू लागल्याने नळेगाव परिसरातील शेतकरी बांधवाना शेती व्यवसायावरील भरोसा उडू लागला आहे. आता उत्पादित मालाच्या राशी घरी जातील अन त्यास योग्य भाव मिळाला तरच शेतात पिकले म्हणायचे, अशीच त्यांची मानसिकता झाली आहे. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभर असतानाही जून महिन्यात मृगाचा पाऊस पडताच शेतकऱ्यांन कडून वेळेत पेरण्या झाल्या. खरिपातील सोयाबीन, तूर, सूर्यफूल, बाजरी, मका आदी पिकेही जोमात आली होती. हि पिके हातातोंडाशी आल्यावर परतीच्या पावसाने दणका देऊन होत्याच नव्हतं केलं.

0 Comments