Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा तालुक्यातील राठोड येथे वीज पडून गाय दगावली

निलंगा तालुक्यातील राठोड येथे वीज पडून गाय दगावली


केळगाव:(प्रतिनिधी वसीम मुजावर) निलंगा तालुक्यातील राठोडा येथे आज सायंकाळी चार वाजता वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पावसामध्ये यामध्ये राठोडा येथील शेतकरी प्रल्हाद सुधाकर कुलकर्णी गट क्रमांक दोनशे पन्नास निटुर शिवारात झाडाखाली बांधलेली गाय वीज पडल्याने मरण पावली यामुळे या गरीब शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांना नेहमी शेतकऱ्याला सामोरे जावे लागत आहे याचा फटका आज वादळी वारा व विजयामुळे या शेतकऱ्याला बसून 50 हजार रुपये किमतीचा आर्थिक फटका बसला आहे तरी प्रशासनाने आर्थिक मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments