पिरूपटेल वाडी येथे विज पडून आजी व नातीचा दुर्दैवी मृत्यू
कासार सिरसी/मदनसुरी: निलंगा तालुक्यातील पिरूपटेल वाडी या गावातील एक महिला व तिची नात या दोघी शेतामध्ये झाडाखाली थांबले असता वीज पडून ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तालुक्यातील पिरूपटेल वाडीतील ललीता नारायण ईरलापल्ले वय 59 वर्ष व पायल सतिष ईरलापल्ले नात वय 12 वर्ष या स्वता:च्या शेतातील झाडाखाली थांबले असता अचानक त्यांच्या अंगावर वीज पडल्याने दोघी आजी नात जागीच ठार झाल्या आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गावचे सरपंच नसरुद्दीन पटेल यांनी तात्काळ तलाठी व पोलीस स्टेशनला माहिती देऊन पंचनामा करून वीज पडून मरण पावलेल्या कुटुंबाला मदत करावी अशी मागणी केली आहे. सदर घटनेची कासार शिरसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हात्तरगा हालसी येथे विज पडून म्हैस दगावली


0 Comments