Latest News

6/recent/ticker-posts

लॉकडाऊनच्या काळात रुद्राली पाटील चाकुरकर यांची गरजवंताना मदतीचा हात;साई फाउंडेशनचा अभिनव उपक्रम

लॉकडाऊनच्या काळात रुद्राली पाटील चाकुरकर यांची गरजवंताना मदतीचा हात;साई फाउंडेशनचा अभिनव उपक्रम 


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) चाकुर शहरात कोरोनाच्या महामारीमुळे गोरगरीब लोकांच्या अन्न धान्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. मागील दोन महिन्यापासुन काम नसल्यामुळे गरीब कुटुबार उपासमारीचे वेळ आली होती. विधवा, निराधार, भुमिहीन, शेतमजुर, मजुर, दिव्यांग, मोलमजुरी करणे अशा अत्यंत गरजुवंत लोकांना चाकुर शहरात किराणा वस्तुचे किट वाटप करण्यात आले. गरजुवंताना किटचे वाटप डॉ.अर्चनाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये वाटप करण्यात आले. यावेळी नरेश पाटील, संजय पाटील, विलास पाटील, अॅड लिंगराज पाटील, विनायक पाटील, विक्रम पाटील, अमरेश्वर पाटील, गजानन संग्राम पाटील, सचिन शेटे, शुभम पाटील, रामेश्वर पाटील,करण पाटील,अनीकेत पाटील, रामेश्वर पाटील, गजानन ईश्वर पाटील, राजकुमार पाटील, यावेळी उपस्थित होते. चाकुर शहरामध्ये सर्वात जास्त उपेक्षित व दुर्लक्षित असलेल्या गरीब महिला व त्यांच्या कुटुबियाना सध्याच्या महाभयंकर कोरोना कलाखंडात उपासमारीची वेळ आली होती. माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांची नात अॕड.रुद्राली शैलेश पाटील आणि रूशीका शैलेश पाटील चाकूरकर यांनी साई फाउंडेशन च्या माध्यमातून या सर्व कुटुंबियाना घरपोच आन्नधान्याचे किट व सॕनिटरी पॕडचे वाटप केले. या आन्नधान्याच्या कीट मध्ये तांदुळ, गव्हाचे पिट, तेल, मिठ, अर्धा किलो साखर, दाळ मिरची, हाळद व इतर साहित्य आहे. याप्रसंगी रुद्राली पाटील चाकुरकर यांनी लातुर जिल्ह्यात व मराठवाड्यात कोठेही गरजु कुटुंबास अन्नाधान्याचे किट सह ईतर मदतीची आवश्यकता असल्यास साई फाउंडेशन व्दारे केली जाईल असे सांगितले. रुद्राली पाटील चाकूरकर व रूषीका शैलेश पाटील चाकुरकर या दिल्ली नोएडा येथे साई फाऊंडेशन च्या माध्यमातून महिला व गरिबांची सेवा आणि मदत मोठ्या प्रमाणात करत असतात. त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. चाकुर शहरात गरजुवंताना किट वाटप केल्यामुळे लोकांनी साई फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमाबदल समाधान व्यक्त केला. अत्यंत गरजुवंत व ज्यांना या किटची आवश्यकता आहे अशाना किट वाटप करण्यात आले तसेच उपस्थित साई फाऊंडेशनची सर्व टिम व चाकुर शहरातील पञकार सुधाकर हेमनर, संगमेश्वर जनगावे, विनोद निला, प्रशांत शेटे, संग्राम वाघमारे, विकास स्वामी, सामाजिक कार्यकर्ते शिवदर्शन स्वामी ,आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments