Latest News

6/recent/ticker-posts

गणिती व्यक्तिमत्व डॉ.नीलकंठ बिराजदार यांचे निधन

गणिती व्यक्तिमत्व डॉ.नीलकंठ बिराजदार यांचे निधन


मदनसुरी:(प्रतिनिधी) कोकळगाव ता.निलंगा जि.लातूर येथील रहिवासी डॉ. निळकंठ शंकरराव बिराजदार यांचे बुधवार दि.26 मे 2021 रोजी पुणे येथे वयाच्या 85 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,तीन मुली,नातवंडे, पणतू असा परिवार आहे. डॉ.बिराजदार हे यशवंत महाविद्यालय नांदेड येथे दीर्घकाळ गणित विभागाचे विभागप्रमुख होते.ते स्वामी रामानंद तीर्थ  मराठवाडा विद्यापीठनांदेड येथे पहिल्या गणित अभ्यासक मंडळाचे सदस होते. डॉ.बिराजदार हे अत्यंत प्रामाणिक ,कर्तव्यदक्ष,अभ्यासू, मितभाषी,स्वच्छ व पारदर्शक,मनमिळावू व्यक्तीमत्व होते. त्यांच्या जाण्याने कोकळगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.

Post a Comment

0 Comments