Latest News

6/recent/ticker-posts

चाकुर शहर कॉग्रेस पार्टीच्या वतीने,आम्ही चाकुरकर ग्रुपच्या आहवानांस प्रतिसाद

चाकुर शहर कॉग्रेस पार्टीच्या वतीने,आम्ही चाकुरकर ग्रुपच्या आहवानांस प्रतिसाद 


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) कोरोनाच्या महामारीमुळे अनेक रुग्णांना वैद्यकिय सेवेच्या अभावामुळे अनेक अडचणीचा समाना करावा लागत आहे. महाभंयकर कोरोनाच्या विषाणूने हाहाकार माजवला आहे.चाकुर तालुक्यात कोविड केअर सेटर व डेडीकेटेड हेल्थ सेटर मध्ये कोरोना बांधित रुग्णांना उपचारासाठी अॕडमिट करण्यात येत आहे.कोरोना बांधित रुग्णांची व नातेवाईकांची होणारी हेळसांड पाहुण चाकुर येथील पञकार बांधवांनी पुढाकार घेऊन आम्ही चाकुरकर व्हट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आहवान केले होते. त्यांच्या आहवानांस प्रतिसाद देत. चाकुर तालुक्यात कोविड केअर सेंटर मध्ये अग्नीशामक सिलेंडर देण्यांचे आहवान करण्यात आले होते. त्या आहवानांस प्रतिसाद देते भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पार्टीचे चाकुर तालुका अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष विलास पाटील चाकुरकर यांनी कोविड केअर सेटर मध्ये आठ अग्नीशामक सिलेंडर स्वखर्चातुन स्वतःहुन त्यांनी दिले. जर अचानक कोविड केअर सेटर मध्ये काही अनुचित प्रकार होऊन आग लागली तर ती आग आटोक्यात आण्यासाठी प्रशासनांची धावपळ होऊ नये म्हणून अग्नीशामक सिंलेडर देऊन आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. कॉग्रेस पक्षाचा सेवाभाव त्यांनी दाखवुन दिला आहे.

भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पार्टीचे युवा नेते व नगरसेवक शामला झांबरे,आनंद झांबारे यांनी माझी रुग्णवाहिका,आम्ही चाकुरकर या ग्रुपच्या आहवांनास प्रतिसाद देत त्यांनी ५१,००००/( एकावन हजार) रुपयांचा धनादेश दिला अतिगंभीर रुग्णांना घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका घेण्यात येणार आहेत.

तसेच चाकुर शहर कॉग्रेस पार्टीचे पदधिकारी यांनीही माझी रुग्णवाहीका आम्ही चाकुरकर ग्रुप यांच्या आहनाला प्रतिसाद देत.१५,००० (पंधरा हजार) रुपयेची मदत रुग्णवाहिका घेण्साठी करण्यात आली.नुकतेच पंधरा हजार रुपयांचा धनादेश विलास पाटील चाकुरकर यांच्या हस्ते देण्यात आला.ही मदत करण्यासाठी कॉग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष शेख हुसेन पप्पुभाई,युवक कॉग्रेस जिल्हा सरचिटणीस भागवंत फुले,कॉग्रेस पार्टी  सोशल मिडीया प्रमुख सलीमभाई तांबोळी,प्रकाश पटणे,बाळु इरवाने,सचिन चाकुरकर यांनी पुढाकार घेतला.

सेवादल कॉग्रेस पार्टीचे शहरध्यक्ष बाळु इरवाने यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त २५ किलो पेड खजुर कोविड केअर सेटर मध्ये रुग्णांना वाटप केले,खजुर खाल्याने रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती वाढते.

आम्ही चाकुरकर ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहवानांस कॉग्रेस पार्टीच्या वतीने प्रतिसाद देण्यात आला. माझी रुग्णवाहिका,आम्ही चाकुरकर ग्रुपच्या माध्यमातून चाकुर येथील पञकार प्रशांत शेटे,सुधाकर हेमानर,संगम जनगावे,विनोद निला,संग्राम वाघमारे,विकास स्वामी,सदाशिव मोरे,सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन स्वामी आदीच्या संकल्पतेतुन चाकुर शहरात रुग्णांना उपचारासाठी लागणारा खर्च आवाक्यात राहावा व नातेवाईकांची धावपळ होऊ नये म्हणून पुढाकार घेऊन रुग्णवाहिका आण्यासाठी प्रयत्नांची परकाष्टा करीत आहेत.

Post a Comment

0 Comments