Latest News

6/recent/ticker-posts

आ.अभिमन्यू पवार यांची कोकळगाव येथील लसीकेंद्रास भेट

आ.अभिमन्यू पवार यांची कोकळगाव येथील लसीकेंद्रास भेट


मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) सोमवार दि.24 मे रोजी निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील उप आरोग्य केंद्रात नागरिकांना कोविड ची लस देण्यात आली. यावेळेस औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली,तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना येत्या काही दिवसांत एक हजार डोस ची उपलब्धता मदनसुरी प्राथमिक आरोग्य केंद्राला पुरवठा करण्याचे आदेश दिले. जेणेकरून मदनसुरी अंतर्गत असणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांचे लसीकरणाची सोय होईल. यावेळी कासार सिरसी मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, तंटामुक्ती अध्यक्ष लालमियाँ शेख, ग्रामसेवक सत्यवान जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.डी.गिरजी, डॉ.अभिजित रुमने, आरोग्य सेवक जीनेंद्र देवसाळे, आरोग्य साहाय्यक ए.बी.देशमाने, आरोग्य सेविका छाया जाधव,आरोग्य सेवक ओ.एल.धुमाळ,एस.डी.सगर,सरपंच गुरलिंग वाकडे,प्राथमिक शिक्षक एम.आय.तांबोळी, शिक्षक गौतम कांबळे, अंगणवाडी मदतनीस बी.बी.मंगणे, आशा कार्यकर्त्या चमाबाई सुर्यवंशी, एस.डी.शेंडगे,यास्मिन शेख, कमलबाई सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती. लसीकरणासाठी नागरिकांचा प्रतिसाद दिसून आला.

Post a Comment

0 Comments