स्वयम् शिक्षण प्रयोग द्वारा जिल्हा आरोग्य अधिकारी सोबत व्ही सी
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील सत्यम शिक्षण प्रयोग द्वारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ परगे यांच्यासोबत कर्जगाव ते लातूर थेट व्हि सी द्वारे मीटिंग आयोजित करण्यात आली होती. कोविड जनजागृतीची उपयोगिता लक्ष्यात घेता रविवार दि 23 मे 2021 रोजी लातूर जिल्ह्यात स्वयं शिक्षण प्रयोग अंतर्गत लीडर यांच्यासोबत गावातील व्यक्ती आणि कॉविडं ऍक्टिव्ह अकॅशन कमिटी मधील सर्व सदस्य यांच्या सोबत लातूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा आरोग्य अधिकारी( DHO )परगे ,आरोग्य अधिकारी डॉ संतोष हिंदोळे यांनी कोवीड जनजागृती विषयी व्ही सी द्वारे सखोल मार्गदर्शन आणि समजेल अशी माहिती दिली. खबरदारी,अपप्रचार आणि शंका या विविध प्रश्नाचे निरसण केले,यावेळी प्रशिक्षणाला संस्थेचे संचालक उपमन्यु पाटील, दिलीप ढवण, तालुका समन्वयक अंजली मसलकर, सुमित्रा जाधव व तालुक्यातील सर्व लीडर उपस्थित होते. यावेळी कोव्हिड 19 विषयी माहिती लक्षणे काय आहेत आणि ते आढळल्यास काय उपाय योजना आखली पाहिजे आणि ती परस्थिती कशी हाताळली पाहिजे याबाबात मार्गदर्शन केले. तर घरामध्ये कोणाला कोरोना झाला असेल तर आपण कशा पद्धतीने घरातील व्यक्तीने राहिली पाहिजे. मास्क,सानिटायजर,सुरक्षित अंतर,स्वछता,सात्विक अन्न, स्वच्छत कपडे वापरण्या विषयी माहिती अशा संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले असल्याचे या संस्थेच्या मुख्य प्रवर्तक आणि तालुका समन्वयक सुमित्रा जाधव यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

0 Comments