Latest News

6/recent/ticker-posts

कोरोना महामारीमध्ये चोख आरोग्य सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती फेरे

कोरोना महामारीमध्ये चोख आरोग्य सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती फेरे


बी डी उबाळे

औसा: कोरोना महामारीमध्ये चोख आरोग्य सेवा बजावून जनसामान्य नागरिकाचे आरोग्य जपणाऱ्या माणसातील देव माणसापेक्षा कमी नसणाऱ्या अशा वैद्यकीय अधिकारी डॉ स्वाती फेरे. मागील ११ वर्षा पासून औसा तालुका येथे ग्रामीण भागातील जनतेसाठी देवदूत ठरत असलेल्या वैद्याकिय आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती फेरे यांनी आपल्या ११ वर्षाच्या सेवेमध्ये अनेक गरजू रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारची सेवा देऊन अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. ३१मे २०१० रोजी ग्रामीण रुग्णालय औसा येथे राष्ट्रीय ग्राम स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत आरोग्य तपासणी पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणू त्यांची नेमणूक झाली, औसा तालुक्यतील २४० शाळा व ३४२ अंगणवाडीतील  0 तो १८ वयोगटातील सर्व बालकांची आरोग्य तपासणी किरकोळ आजारावर तत्काळ औषधाद्पुचार व गंभीर रुग्णास जिल्हा रुग्णालय येथे संदर्भ सेवा देण अशी कामे त्या अविरत पणे करत असत. त्यांच्या या सेवेच्या कला मध्ये त्यांनी ४३ शालेय विध्यार्थ्याच्या मोफत  हृधय शत्रक्रिया पुणे मुंबई येथे करून घेतल्या तसेच वार्षिक किमान १०० मुलामुलींचे हर्निया व इतर आजारावरील शत्रक्रिया शासकीय रुगणालय लातूर येथे करून घेतल्या व तसेच  विविध राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये उस्फुर्त सहभाग घेऊन औसा तालुक्य मध्ये त्यांनी अनेमिया मुक्त भारत, अंधत्व निर्मुलन कार्यक्रम, व्यसनमुक्ती अभियान अशा अनेक योजनाचा ग्रामीण जनतेस फायदा करून दिला आहे. दि २७ एप्रिल २०२० रोजी त्यांची समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर प्राथमिक आरोग्य केंद्र हसलगन अंतर्गत धानोरा आरोग्य उपकेंद्र येथे नियुक्ती झाली. या कोरोना काळात त्यांनी धानोरा, शिवणी, भुसणी, गोन्द्री या ग्रामीण भागात कोरोना चाचण्या करणे, गृह विलगीकरण करणे, कोरोना विषयक उपाययोजनांची जनजागृती करणे अशी अनेक कामे करून अनेक कोरोना योद्धा पुरस्कार प्राप्त केले. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र मातोळा अंतर्गत नांन्दुर्गा उपकेंद्र येथे समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून त्या आपली सेवा देत आहेत यामध्ये 

● गरोदर महिला व नवजात बालके यांना आरोग्य सेवा देणे,

● लहान बालके व किशोर वयीन मुलामुलींना आरोग्यविषयक जागरूक करणे,

● कुटुंब नियोजन या बद्दल जनजागृती करणे,

● साथ रोग आजाराचे नियंत्रण करणे,

● मधुमेह उच्च रक्तदाब या सारख्या असंसर्गजन्य आजारांची नियमित तपासणी करून घेणे.

● मानसिक तसेच मौखिक आरोग्य विषयक सेवा देणे.

● अत्यावश्यक सेवा देणे,

कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेमध्ये  लातूर येथील जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत 1 हजार मुलामुलींचे शासकीय वसतिगृह येथे DCHC केंद्र सुरु करण्यात आलेले आहे.तेथे त्या सध्या आपली सेवा देत आहेत. वीज नियामक मंडळाचे निवृत्त  कार्यकारी अधिकारी सुरेश मुकुंद फेरे यांच्या त्या कन्या आहेत व त्यांच्याप्रमाणेच निस्वार्थपणे जनसेवा देत आपले कर्तव्य बजावत आहेत.त्यांच्या निस्वार्थ आणि कार्य तत्पर सेवेला अनेक भारतीयांचा पुन्हा एकदा सलाम.

Post a Comment

0 Comments