उपजिल्हा रुग्णालय येते डेडीकेटेड क्रिटिकल केअर वॉर्डचा लोकार्पण सोहळा संपन्न
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) अक्का फाऊंडेशनच्या वतीने निलंगा उपजिल्हा रुग्णालयात लातूर जिल्ह्यातील पहिला सर्व वैद्यकिय उपकरणांनी युक्त वातानुकुलीत "डेडीकेटेड क्रिटिकल केअर वॉर्डचा" लोकार्पण सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा परिणाम हा लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याने प्री-प्रायमरी स्कूल टीचर्स, शहरातील सर्व बालरोगतज्ञ, नर्सिंग स्कूल संचालक यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. शहरातील सर्व कुटुंबातील १८ वर्षा खालील मुलांची व बालकांची सर्व मेडिकल हिस्ट्री रिपोर्ट कार्ड काढण्याच्या सूचना व नगरपरिषद मुख्य अधिकाऱ्यांना युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिल्या. त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग लहान मुलांना होणार नाही याबाबत विशेष दक्षता म्हणून महाराष्ट्र राज्य स्तरावरील ''सर्व सोयींनी युक्त मनोरंजनाची साधने असलेल्या शासकीय निर्देशाप्रमाणे बालकांसाठी विशेष अतिदक्षता वॉर्ड'' तात्काळ तयार करण्याच्या सूचना देखील प्रशासनाला दिल्या आहेत. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व मदत आपण करणार आहोत असे अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले त्याचप्रमाणे सर्व पक्ष, संघटना, पत्रकार यांनी देखील प्रशासनाला आपल्यापरीने मदत करणे आवश्यक आहे. या कोरोनाच्या काळात आरोग्य विभाग, प्रशासकीय यंत्रणा, स्वच्छता कर्मचारी, आरोग्य सेवक, डॉक्टर्स यांचेही काम खरोखरच समाधानकारक आहे. दापका रोड येथील कोविड केअर सेंटरला जाणारा रस्ता तात्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अक्का फाऊंडेशन मार्फत सुरु असलेला सकाळचा नाष्टा, दुपारचे व संध्याकाळचे जेवण याबाबत माहिती घेऊन लसीकरण मोहिमेअंतर्गत कार्य करणाऱ्या अक्का फाऊंडेशन लसीकरण टास्क फोर्स स्वयंसेवकांशी चर्चा केली व निलंगा नगरी व्हाट्सअप ग्रुप यांनी भेट दिलेल्या पाणी फिल्टरचे लोकार्पण केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक लक्ष्मणजी देशमुख, उपविभागीय अधिकारी विकासजी माने, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमारजी कोल्हे, नायब तहसीलदार घनश्यामजी अडसूळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रल्हादजी सोळुंके, डॉ.एस. एस. शिंदे, निलंगा नगर परिषदेचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, निलंगा नगर परिषदेचे मुख्याधिकारी मल्लिकार्जुनजी पाटील, परिचारिका सौ.भाग्यश्रीताई काळे, नितीनजी मेहत्रे, नितीन जाधव, बाळूजी सोमानी, श्रीमती डॉ.तेजश्रीजी बंडगर, डॉ.दिपकजी हुगे , डॉ.खुसेकर ,मल्लिकार्जुनजी कोळ्ळे, विनोदजी सोनवणे, तम्मा माडीबोने, डॉ.लालासाहेब देशमुख, डॉ.तात्यासाहेब देशमुख ,राजेंद्रजी पवार, किशोरजी जाधव, सुमीतजी इनानी, डॉ.सतीशजी पाटील, डॉ.एस.एस.बिरादार, डॉ.ढोबळेजी, डॉ.लालासाहेब, डॉ.शिंदे, डॉ.किरण बाहेती , डॉ.तळीखेडकर स्टाफ श्रीमती यास्मिन मुल्ला , सुरेखा माने ,अंजुम सौदागर , दाडगे , कारळे लक्ष्मण फुलसुंदर , रामदास सोमवंशी ,दत्तात्रय म्हेत्रे , अर्जुन कुमठे , अतिक शेख , अक्षय वाघमारे , सुरवसे संकेत , विजय घाडगे , गोवर्धन जाधव ,गोपाळ जाधव , मदार अलगुडे आदींची उपस्थिती होती.
0 Comments