पालकमंत्री अमित देशमुख यांच्या आदेशानुसार लवकरच सुरु होणार,५० खाटांचे डेडीकेटेड हेल्थ सेंटर
विलास पाटील चाकुरकर यांनी केली डेडीकेटेड हेल्थ सेंटरची पाहणी
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) चाकुर शहरातील व तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी उदगीर किंवा लातुर येथे पाठविण्यात येत होते.गोरगरीब लोकांना उपचारासाठी लागणारे खर्च परवडणारे नव्हते. मागील एक दिड वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे प्रशासनाने लॉकडाऊन लावल्यामुळे अनेक लोकांच्या हाता काम नाही.काम नसल्यामुळे दामही नाही.अशा परिस्थितीत कोरोना बांधित रुग्णांवर उपचार करणे सर्वसामान्यांच्या अवाक्या बाहेर होते. अशा परिस्थितीत चाकुर येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये ५० डेडिकेटेड हेल्थ सेटर लवकर सुरु होणार आहे. कोरोना बांधित रुग्णांसाठी संजीवणीच ठरणार आहे. अतिगंभीर रुग्णांना उपचारासाठी अॉक्सिजन बेड उपलब्ध नव्हते.महाराष्ट्र राज्यांचे वैद्यकिय शिक्षण मंञी, सांस्कृतिक कार्य मंञी तथा पालकमंञी अमित विलासराव देशमुख गेल्या महिन्यात कोविड केअर सेटर मधील सोयी-सुविधेचा आढावा घेण्यासाठी चाकुर येथील कोविड केअर सेटर मध्ये आढावा बैठक घेतली होती.त्याबैठकी मध्ये विलास पाटील चाकुरकर यांनी पालकमंञ्यांना चाकुर येथे ५० डेडीकेटेड हेल्थ सेटरची मागणी केली होती.त्यामागणीची तात्काळ दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सुचना केली की,चाकुर येथे लवकरच ५०डेडीकेटेड हेल्थ सेटरचे काम करावे अशी सुचना केली होती आज जवळपास डेडिकेटेड हेल्थ सेटरचे काम पुर्णतत्वास जात आहे. आज विलास पाटील यांनी स्वतःह याकामाची पाहणी केली.तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी यासंबंधी कामांची संपूर्ण माहिती दिली व काही दिवसानंतर डेडीकेटेड हेल्थ सेटर रुग्णांच्या सेवेसाठी सुरू राहणार आहे.चाकुर तालुक्यात व शहरात दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता.अनेक रुग्ण कोरोना संसर्गाच्या विखाळ्यात अडकले होते. अशा महाभयकर परिस्थितीत मध्ये चाकुर येथील ग्रामीण रूग्णालयात ३० बेडचे डेडीकेटेड हेल्थ सेटर चालु करुन अनेक अतिगंभीर रुग्णांनवर उपचार करुन त्यांना ठणठणीत बरे करु घरी पाठविण्यात आले आहे.भविष्यात जर आपल्या तालुक्यात तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढल्यास त्यांची पुर्व नियोजित तैयारी करण्यात आली आहे.असे डॉ.शिवानंद बिडवे म्हणाले कोरोना बांधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी चाकुर येथील डॉक्टर व मेडीकल स्टॉप खुप परिश्रम घेत आहे. ५० खाटांचे डेडीकेटेड सेटर चालु व्हावे म्हणून अनेकजणांनी प्रयत्न केले आहेत.काही दिवसांनी डेडीकेटेड हेल्थ सेटर चालु होणार आहे.सर्व सोयी सुविधांची आज पाहणी करण्यात आली. चाकुर शहरातील व तालुक्यातील कोरोना बांधित रुग्ण व नातेवाईकांची दमछाक थांबणार आहे तसेच उदगीर व लातुर येथे जाऊन उपचार घेण्यात होणारी अडचण दुर होणार आहे असे. वैद्यकिय अधीक्षक डॉ.दिपक लांडे म्हणाले. पालकमंञ्यांनी ५० खाटांचे डेडिकेटेड हेल्थ सेटर सुरू करुन दिल्याबदल त्यांचे यावेळी पाहणी दरम्यान विलास पाटील यांनी आभार मानले. यावेळी भागवत फुले, शेख हुसेन पप्पुभाई, सलीमभाई तांबोळी, विजय धनेश्वर, बाळु इरवाने उपस्थित होते.
0 Comments