Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा येते स्व.राजीवजी सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

निलंगा येते स्व.राजीवजी सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण 


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राज्यसभा सदस्य स्व.कै.राजीवजी सातव यांना निलंगा तालूका काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, शिवसेना तालुका प्रमुख अविनाश दादा रेशमे, माजी जि. प.अध्यक्ष पंडित धुमाळ, अनिल अग्रवाल, दयानंद चोपणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष इस्माईल लदाफ ,अजित निंबाळकर, माजी नगरसेवक सिराज देशमुख, अशोक शेटकार, काँग्रेस अल्पसंख्याकचे तालुका अध्यक्ष लाला पटेल, दिगंबर सूर्यवंशी, तुराब बागवान आदी जण उपस्थित होते. राजीव सातव हे कमी वयात मोठया पदापर्यंत गेले होते पंचायत समिती सदस्य पासून ते विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्य सभा सदस्य, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, असे महत्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वी पार पाडल्या.

स्व.राजीव सातव यांच्या निधनानंतर पोकळी निर्माण झाली  ते नुकसान भरून न येण्यासारखे आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments