विद्युत पुरवठा सुरळीत करा अन्यथा युवासेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यातील अनेक गावांमध्ये मागील एक महिन्यापासून विद्युत पुरवठा सुरळीत केला जात नाही. नणंद, धानोरा, बामणी, मन्नतपुर, गुंजरगा, राठोडा,सावरी, मानेजवळगा येथील विद्युत पुरवठा हा गेल्या एक महिन्यापासून सुरळीतपणे चालू नाही. तसेच गुंजरगा येथे 63 केव्ही चा डीपी, सिंगल फेज चे 25 केवी ट्रांसफार्मर तीन, स्वतंत्र लाईनमन व बोरसुरी फीटर हून गुंजरगा या गावास विद्युत पुरवठा करण्यात यावा. विद्युत अनियमिततेबाबत मुख्य कार्यकारी अभियंता मा.ढाकणे साहेब यांना वारंवार सांगून सुद्धा विद्युत पुरवठा हा सुरळीत केला जात नाही.आपणास वारंवार सांगून सुद्धा जेथे जेथे विद्युतपुरवठया मध्ये दोष असेल तो काढले गेले नाहीत. अगोदरच कोरोणा मुळे प्रत्येक गावातील जनता त्रस्त आहे आणि सर्वजण आपल्या घरामध्ये आहेत. उन्हाळा असल्यामुळे उकाड्यामुळे लोक हैराण झाले आहेत तरी मे. साहेबांनी विद्युत पुरवठा हा सुरळीतपणे चालू करावा अन्यथा युवासेनेतर्फे तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यांनी महावितरणला दिला. यावेळी सहाय्यक कार्यकारी अभियंता पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर धनराज मुळे, मोहन पाटील, दीपक गिरी, अनंत धुमाळ, गुणवंत शिंदे, अरविंद धुमाळ, भीम शिंदे, संदीप पाटील, रघुनाथ शिंदे, दिगंबर शिंदे, अनिल जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

0 Comments