Latest News

6/recent/ticker-posts

पूजनीय भंते सुमेधजी नागसेन भंतेजी यांनी आ. अभिमन्यू पवारची भेट घेऊन खरोसा बुद्धविहार विकासाबाबत निवेदन सादर

पूजनीय भंते सुमेधजी नागसेन भंतेजी यांनी आ. अभिमन्यू पवारची भेट घेऊन खरोसा बुद्धविहार विकासाबाबत निवेदन सादर 


बी डी उबाळे

औसा: येथे सुमेधजी नागसेन भंतेजी यांनी आ पवार औसा यांची भेट घेऊन श्रावस्ती बुद्ध विहार, खरोसा ता. औसा येथील विकास कामांसंदर्भात निवेदन दिले. खरोसा येथील महाबोधी लोकहिताय चॅरिटेबल ट्रस्टच्या जमिनीच्या बाजूला वहिवाटीचा शेतरस्ता असून त्या रस्त्यावरून रोज शेकडो शेतकरी रोज ये जा करतात. त्या शेतरस्त्याचे काम करण्यात यावे तसेच सामाजिक सभागृहाच्या आजूबाजूला मोकळ्या असलेल्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात यावी, विद्युतीकरण व सुशोभीकरण करण्यात यावे. अशा विविध विकास कामाच्या मागण्यांचे निवेदन आज शुक्रवार दि 21 मे 2021 रोजी औसा येथे भंते सुमेधजी नागसेन भंतेजी यांनी आ पवार यांची भेट घेऊन दिले. सध्या श्रावस्ती विहार, खरोसा येथे माझ्या आमदार निधीतून१५ लक्ष रुपयांची विकासकामे प्रगतीपथावर असून पूजनीय भंतेजी यांनी दिलेले निवेदन माझ्यासाठी आदेशस्वरूप असल्याने त्यांनी सुचवलेली इतरही कामे प्राधान्याने केली जातील असा शब्द त्यांना दिला. यावेळी राजेंद्र(आबा) बनसोडे व मारुती कांबळे सोबत उपस्थित होते.(आ. अभिमन्यू पवार यांच्या फेसबुकवरून)

Post a Comment

0 Comments