खरीप पेरणीसाठी बळीराजाची खते-बियाणेसाठी धावपळ;पैसे नसल्याने मोठे आर्थिक संकट,अनेक शेतकरी विम्यापासून वंचित
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील अनेक शेतकरी बांधवांनी खरीप हंगामातील पीक विमा मोठ्या प्रमाणात भरला होता. विम्याची रक्कम मोठ्या संख्येने मंजूर झाली.परंतु सदरील विम्याची रक्कम ही बोटांवर मोजता येईल इतकेच शेतकरी बांधवांना खात्यावर मिळाली असून त्यामुळे विमा कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून त्यामुळे शेतकरी बांधवांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कंपनी जाणिव पुर्वक जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाची हेळसांड करत असल्याचे बोलले जात असूनमृग नक्षत्राच्या आगमनाला आता केवळ पंधरा दिवसाचा कालावधी असल्याने शेतकरी पेरणीपूर्व मशागत करून काळ्या आईची ओटी भरण्यासाठी खते व सोयाबीन उडीद मूग हायब्रीड तूर इत्यादी बियाण्याची जुळवाजुळव करण्यासाठी सरसावला आहे. शेतकरी आता कोरोणा विषाणू चे संकट असल्याने शेतीपूरक व्यवसायाला सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वेळ दिल्याने ग्रामीण भागातून शेतकऱ्यांनी आता थेट कृषी सेवा केंद्र गाठायला सुरुवात केली आहे .सोयाबीन चे भाव प्रति क्विंटल 7 हजार 500 पर्यंत गेल्याने सोयाबीन बियाण्याची समस्या भेडसावणार आहे.महाबीज कंपनीने 30 किलोच्या बॅगसाठी 2 हजार 250 रुपये दर निश्चित केला असून इतर कंपनीचे 30 किलो बियाण्यासाठी 3 हजार 300 रुपये मोजावे लागत आहेत. औसा बाजारपेठेत महाबीज बियाणे अद्याप उपलब्ध झाले नाही. कृषी विभागाने बीज प्रक्रिया करून उगवण क्षमता तपासून घरचे बियाणे वापरण्याचा सल्ला दिला असला तरी अनेक शेतकऱ्याकडे घरगुती बियाण्याची उपलब्धता नसल्याने प्रमाणित बियाणे खरेदीसाठी शेतकरी कृषी सेवा केंद्राकडे धाव घेत आहे. रासायनिक खताचे दर वाढल्याचे कंपन्यांनी जाहीर करताच जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याने केंद्र सरकारने रासायनिक खतावरील सबसिडी वाढ केली असून डीएपी व इतर मिश्रखते आता पूर्वीच्या दराने मिळतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे खते व बियाण्यांची खरेदी करून शेतकऱ्यांना पावसापूर्वी संपूर्ण तयारी करावी लागते. या वर्षी मान्सूनचे आगमन वेळेत होईल व समाधानकारक पाऊस पडेल असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे कोरोना च्या पार्श्वभूमीवर 31 मेपर्यंत लॉक डाऊन असल्याने व पुढेही लॉक डाऊन वाढण्याची शक्यता असल्याने खरीप पेरणीसाठी चे दिवस जवळ येत असून शेतकऱ्यांनी खते बि-बियाणे खरेदीची तयारी सुरू केली आहे. शहरातील कृषी सेवा केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी कृषी सेवा केंद्र चालक प्रयत्न करीत असून ग्राहकांनाही कोरोना नियम पाळण्यासाठी सांगत असले तरी मानावा तितका प्रतिसाद खते बियाणे खरेदी साठी सध्या तरी दिसत नाही. कारण लॉक डाऊन मुळे शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. शेतीतील भाजीपाल्यास भाव मिळत नाही यामुळे शेतकऱ्याची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे.
आमच्या गावात बोटांवर मोजता येईल इतकेच शेतकरी यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा झाली असून अनेक शेतकरी बांधव विम्याच्या लाभापासून वंचित राहिले असून जे वंचित राहीले शेतकरी आमच्या आपले सरकार सेवा केंद्राकडे येवून विचारणा करत आहेत की आमचा विमा कसा काय आला नाही आम्ही त्यांना काय उत्तर देणार.... तरी कंपनीने राहिलेल्या सर्व शेतकरी बांधवांना तात्काळ विमा त्यांच्या खात्यावर जमा करावा जेणेकरून शेतकरी बांधव यांना पेरणीच्या तोंडावर मोठी मदत होईल अशी अनेक शेतकऱ्याची अपेक्षा व्यक्त केली.


0 Comments