नळेगाव येथे गायीने दिला दोन पाडसांना जन्म
नळेगाव:(प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे) येथील शेतकरी नामदेव बाबुराव साळुंके यांच्या लाल कंधार गायीने गुरुवारी रात्री दोन वासरांना जन्म दिला असून दोन्ही वासरू अगदी ठणठणीत आहेत. नळेगाव येथील शेतकरी नामदेव साळुंके हे गेल्या 25 ते 30 वर्षांपासून शेती करतात.शेतीबरोबरच जनावरे पाळण्याचा छंद असून ते आपल्या मुलाप्रमाणे जनावरांचा सांभाळ करतात. त्यांचे कडे दोन बैल, एक म्हैस व एक लाल कंधार गाय असून गुरुवारी रात्री त्यांच्या गायीने दोन वासरांना जन्म दिला असून या परिसरातील शेतकरी या वासरांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली असून शेतकरी नामदेव साळुंके यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. यावेळी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
0 Comments