Latest News

6/recent/ticker-posts

किल्लारी पोलीस ठाण्याचे पी.एस.आय.अमोल गुंडे यांची द नॅशनल गोल्डन ऑफ सोशल वर्कर या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड

किल्लारी पोलीस ठाण्याचे पी.एस.आय.अमोल गुंडे यांची द नॅशनल गोल्डन ऑफ सोशल वर्कर या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड


मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) औसा तालुक्यातील किल्लारी पोलीस ठाण्याचे पी.एस.आय.अमोल गुंडे याना कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी कोविड काळात त्यांनी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल आरंभ प्रतिष्ठान पुणे च्या वतीने निस्वार्थ समाजसेवेची दखल घेऊन द नॅशनल गोल्डन ऑफ सोशल वर्कर (राष्ट्रीय सुवर्ण समाजसेवक) या राष्ट्रीय पुरस्काराची त्यांची निवड करण्यात आलेली आहे. खाकी वर्दीतील देवमाणूस म्हणून किल्लारी परिसरात ज्यांची ओळख आहे, असे किल्लारी पोलीस ठाण्याचे पी.एस.आय.अमोल गुंडे यांनी कोविड काळात रक्तदान शिबीर आयोजित करणे, प्लाझ्मा दान करणे, फूटपाथवर असणाऱ्याना अन्नछत्र उघडणे, लॉक डाऊनमध्ये अडकलेल्या  प्रवाशाना व्यवस्थित त्यांच्या घरी सोडणे, परिसरातील नागरिकांना घरीच राहण्याचे वारंवार आवाहन करणे ,कायदा सुव्यवस्था राखणे आदींचे उल्लेखनीय कार्य पाहून त्यांना आरंभ प्रतिष्ठान पुणे च्या वतीने राष्ट्रीय पुरस्काराची निवड करण्यात  आली आहे. त्यांच्या या यशाबद्दलकिल्लारी परिसरातून कौतुकाचा वर्षाव केला जातो आहे.

Post a Comment

0 Comments