भादा शिवारात शेततळ्यात पडलेल्या सापाला मिळाले जीवनदान
बालाजी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा शिवारातील शेततळ्यात पडलेल्या सापाला सर्पमित्राच्या सहाय्याने मिळाले जीवनदान. भादा माजी सरपंच,एम डी आर टी विमा प्रतिनिधी तथा लोकरत्न विलासराव देशमूख मांजरा साखर कारखाना चे तज्ञ संचालक महेंद्रनाथ जयवंतराव भादेकर यांची भादा शिवारात शेती असून शेतातील सालगडी जेजेरथ उबाळेने शेताध्ये असंलेल्या 46 बाय 46 मीटर या शेततळ्यात बुधवार दि 19 मे 2021 रोजी सकाळी 9-30मी शेततळ्यात साप पडला असल्याचे सांगितले तेव्हा शेतकरी भादेकर यांनी ताबडतोब सर्प मित्रास फोनवर संपर्क करुन शेतीमध्ये येन्यास सांगितले.तेव्हा सर्पमित्र प्रेम विटबोणे यांना सांगताच त्यांनी ताबडतोब येवुन शेततळेतील साप 40 फूट खोलीवर असलेल्या तळ्यातील पाण्यामध्ये दोरीच्या सहाय्याने उतरून बाहेर काढला व एका सापाला जिवनदान मिळाले दिले. अशा प्रशिक्षीत सर्प मित्रांचा मोबाईल नंबर हा-7709614359 असून आपल्या परिसरातील नागरिकांनी साप आढळल्यास सर्प मित्र प्रेम विठुबोने याच्याशी संपर्क साधावा असेल आवाहन करण्यात येत आहे.
0 Comments