Latest News

6/recent/ticker-posts

मदनसुरी,कोकळगाव परिसरात पेरणीपूर्व मशागतींना वेग

मदनसुरी,कोकळगाव परिसरात पेरणीपूर्व मशागतींना वेग


मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) निलंगा तालुक्यातील मदनसुरी, कोकळगाव, रामलिंग मुदगड, अंबुलगा वि., हडोळी, कासार सिरसी, हरीजवळगा , सरवडी आदी ग्रामीण परिसरात पेरणीपूर्व मशागतींना वेग आलेला आहे. परिसरातील बळीराजा सकाळ सायंकाळच्या सत्रात शेतात पाळ्या मारणे, कचरा कस्पट गोळा करणे, शेणखत घालणे, पेरणीसाठी शेत सज्ज ठेवण्यात व्यस्त दिसत आहेत. याबरोबरच बैलजोडी खरेदी करणे, बि-बियाणे गोळा करणे आदी शेतकऱ्यांच्या कामांना गती आलेली आहे. मृग बरस्सला की बळीराजाची मूठ चाड्यावर असणार आहे.

Post a Comment

0 Comments