भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष कुलदीप जाधव यांच्या प्रयत्नाने धानोरा गावाला 100 लस उपलब्ध
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) निलंगा तालुक्यातील धानोरा गावात गेल्या लाटेपेक्षा या दुसऱ्या लाटे मध्ये गावात रुग्ण वाढताना दिसत आहेत रुग्ण संख्या कमी व्हावी अख्ख गाव कोरोनामुक्त व लसीकरण व्हावे म्हणून पुढाकार घेहून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप जाधव यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कदम यांना वारंवार पाठपुरावा करून शेवटी आज कुलदीप जाधव यांच्या प्रयत्नाला यश प्राप्त झालं व मंगळवारी कोविशील्ड च्या 100 लस उपलब्ध करून दिले होते आज मंगळवारी निलंगा तालुक्यातील मौजे धानोरा गावात आज लसीकरण करण्यात आले अपंग व्यक्तींना त्यांच्या घरात जाऊन लस देण्यात आली व गावकऱ्यांचाही लस घेण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळाला भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष कुलदीप जाधव म्हणाले गावात कोणालाही काहीही त्रास होत असेल तर घाबरून न जाता, जास्त दिवस अंगावर न काढता तात्काळ रुग्णालयात जावे असे आवाहन कुलदीप जाधव यांनी केले.
0 Comments