Latest News

6/recent/ticker-posts

महाबीज बियाणे बाजारामध्ये उपलब्ध करून द्यावे-प्रा.आण्णासाहेब मिरगाळे

महाबीज बियाणे बाजारामध्ये उपलब्ध करून द्यावे-प्रा.आण्णासाहेब मिरगाळे


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची मागणी ही महाबीज बियान्याला आहे. परंतु सध्या बाजारामध्ये व्यापाऱ्याकडे महाबीज बियाण्याची मागणी केली असता व्यापारी हे आमच्याकडे महाबिज बियाणे शिल्लक नाही असे सांगतात. कृषी दुकानदाराकडे महाबीज सोडून दुसऱ्या कंपनीचे अनेक बी बियाणे आहेत त्याची किंमत 3500 रु प्रति बॅग असल्यामुळे शेतकऱ्यांना ते  बियाणे परवडत नाही. शासनाचे महाबीज हे बियाणे 2250 रुपयाला प्रति बॅग असल्यामुळे ते बियाणे शेतकऱ्यांना घेण्यास परवडते. त्यामुळे तालुका कृषी अधिकारी यांनी ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधून तात्काळ महाबीज बियाणे बाजारामध्ये उपलब्ध करून द्यावे. जर कोणता व्यापारी बी-बियाणे, खते याची साठवणूक करून काळाबाजार करत असेल तर आपण याची चौकशी करावी,अशी मागणी युवासेनेचे  उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यानी तालुका कृषी अधिकारी काळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments