Latest News

6/recent/ticker-posts

ग्रामीण रूग्णालयात कोरोना बाधित रुग्णांसाठी डॉक्टर ठरले देवधुत

ग्रामीण रूग्णालयात कोरोना बाधित रुग्णांसाठी डॉक्टर ठरले देवधुत


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) कोरोनाच्या महामारीमुळे जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. कोरोना जागतिक महामारीने जगभर हाहाकार उडवुन दिल्यानंतर त्यांच्याशी लढण्याचे मार्गच ज्ञात नसल्याने.या संकटाने जगात जेवढी प्राणहानी केली त्यापेक्षा कैकपटीने जीवनचक्र उद्ध्वस्त करत अर्थहानी घडवली. जवळी नातेगोत्यातील व्यक्तीनांसुध्दा भेटण्यासाठी जाण्यास कोणी तयार नाही.कोरोना बांधित झाल्या रुग्णांना कोणीच जवळ करण्यास तयार नसताना आरोग्य विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.चाकुर ग्रामीण रूग्णालयात अनेक सोयी सुविधा अभाव असताना सुध्दा येथील डॉक्टरांनी अतिगंभीर रुग्णांना जीवनदान दिले आहे.ग्रामीण भागातील रुग्ण आल्यानंतर त्यांचे नातेवाईक रुग्णांवर येथेच उपचार करण्यासाठी आग्रही होते. अक्सिजन बेड,व्हेटीलेंटर,अपुरा स्टॉप,रेडमिशिवर इंजेक्शन,औषधांचा तुटवडा. अशा अनेक समस्या असताना सुध्दा येथील डॉक्टर मंडळीने अत्यंत महनतीने रुग्णांवर उपचार केला आहे.सोम्य लक्षणे असणाऱ्या शेकडो रुग्णांवर चाकुर येथील कोविड केअर सेटर मध्ये उपचार करुन रुग्णांना घरी पाठाविण्यात आले.चाकुरचे तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांच्या प्रयत्नामुळे येथील ग्रामीण रूग्णालयात ३० बेडचे डेडिकेटेड हेल्थ सेटर चालु करण्यात आले.अक्सिजन बेड उपलब्ध झाल्यानंतर रुग्णांची व नातेवाईकांची होणारी धावपळ थांबली.ग्रामीण रूग्णालयात अतिगंभीर रुग्णांवरही उपचार करण्यात येऊ लागले. अतिगंभीर रुग्ण ज्याचे अॉक्सिजन लेवल ३० ३५ व प्लस ४० ते ५० अश्या गंभीर रुग्णांवर वेळेवर व योग्य उपचार करुन त्या रुग्णांना ठणठणीत बरे करुन घरी पाठविण्यात आले.तालुक्यातील अनेक गोरगरीब लोकांनेकडे पैसे नसताना मोफत उपचार करण्यात आले. खाजगी रूग्णालयात लाखो रुपये खर्च येत असताना व लॉकडाऊनमुळे हाता काम नाही. अशा भयंनक परिस्थितीत असताना चाकुर येथील ग्रामीण रूग्णालयात डेडीकेटेट हेल्थ सेटर चालु केल्याने कोरोना बांधित रुग्णांनासाठी संजीवनीच ठरली. ग्रामीण रूग्णालयात कोरोना बांधित रुग्णांवर उपचार झाल्यानंतर काही जणांनी डॉक्टरांचा सत्कार केला.सर्वच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करुन कोरोना रुग्णान वर यशस्वी उपचार केला.आॉक्सिजन नसल्यामुळे रुग्णांना पुढील उपचारासाठी उदगीर किंवा लातुरला पुढील उपचारासाठी पाठविण्यात येत होते. तेथे बेड उपलब्ध होत नसल्यामुळे नातेवाईकांची हैराणी होत असे.चाकुरात डेडिकेटेड हेल्थ सेटर सुरु करुन उपचार होऊ लागल्याने नातेवाईकांची धावपळ थांबली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व खाजगी रूग्णालयात होणारे आर्थिक पिळवणूक थांबली आहे. आरोग्य विभागातील अथक परिश्रम करणारे अधिकारी व कर्मचारी ग्रामीण रूग्णालयांचे वैद्यकिय आधिक्षक डॉ.दिपक लांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अर्चना पंडगे, वैद्यकिय अधिकारी डॉ.पुरुपोत्तम कोंडगिरे, वैद्यकिय अधिकारी डॉ.लक्ष्मीकांत केंद्रे, डॉ.संग्राम नरवटे, डॉ.प्रियंका चव्हाण, डॉ.हर्षवर्धन पाटील, लैलाबी पटवाडे, रोहण जाधव, तांबोळी, अंजली काळे, अमोल उडगे, सुरेश कांबळे यासर्वांनी मिळुन राञनदिवस कोरोना बांधितावर उपचार केले आहे. चाकुर ग्रामीण रूग्णालयांने चांगली आरोग्य सेवा दिल्याबदल त्यांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments