Latest News

6/recent/ticker-posts

निलंग्यात लहान मुलांचे आय.सी.यु लवकरच कार्यान्वित होणार

निलंग्यात लहान मुलांचे आय.सी.यु लवकरच कार्यान्वित होणार


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगांमुळे देशासह महाराष्ट्र या आजारचा सामना करत आहे पहिली लाट झाली दुसरी लाट चालू आहे आता तिसरी लाट येणार आहे असे वर्तवले जात आहे विशेष म्हणजे तिसरी लाट लहान मुलांमध्ये येणार आहे त्यामुळे निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेऊन भाजपा युवा नेते अरविंदभैय्या पाटील निलंगेकर यांच्या 'संकल्पनेतून' उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथील पेड्रट्रिक (लहान मुलांचे) I.C.U वार्डाचे काम सुरू करण्यात आले होते, ते काम प्रगतीपथावर आहे. लवकरच लहान-मुलांसाठी कार्यान्वित होणार आहे यामुळे तालुक्यातील गोरगरीब जनतेला सुविधा उपलब्ध होणार आहे. या कार्याबद्दल सर्वच स्तरातून अरविंद पाटील निलंगेकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments