सौभाग्याचे प्रतीक म्हणून 101 महिलांच्या नावाने 101 वृक्षांचे वृक्षारोपण
देवणी:(प्रतिनिधी विक्रम गायकवाड) मौजे नागतीर्थवाडी येथे उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत एका आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वट पौर्णिमेचे औचित्य साधून सौभाग्याचे प्रतीक म्हणून 101 महिलांच्या नावाने 101 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. याची सुरुवात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी 8 महिला बचत गटांना 15 लाख रु चे वाटप माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते करण्यात आले. सदरील कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रकल्प संचालक संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच VSTF चे नोडल अधिकारी उदयकुमार सोळुंखे, गट विकास अधिकारी मनोजकुमार राऊत सर, शाखा अधिकारी शुभम साहू, तालुका अभियान व्यवस्थापक राजेंद्रप्रसाद विडप, CC लता बोनाकृती, सिद्धार्थ बेद्रे, सुखदेव मलवाड, CRP येलमटे ताई, FLCRP शिंगडे ताई, बँक सखी गुणाले ताई, व इतर मान्यवर आणि ग्रामस्थ आदीची उपस्थिती होती.
0 Comments