ना.जयंतराव पाटील व ना.धनंजय मुंढे यांची अशोक बंगला निलंगा येथे सांत्वनपर भेट
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) आज शुक्रवारी निलंगा येथील अशोक बंगला येथे राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील व ना.धनंजय मुंढे यांनी निलंगेकर कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन लोकनेते स्व.डाॅं.शिवाजीराव पाटील निलंगेकर(माजी मुख्यमंत्री) यांच्या जुन्या आठवणींना ऊजाळा देऊन दादासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन केले यावेळी सुशिलाबाई शिवाजीराव पाटील निलंगेकर (आई), अशोकभैय्या शिवाजीराव पाटील निलंगेकर सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस पार्टी, ना.धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री, विजयकुमार शिवाजीराव पाटील निलंगेकर, वृषालीताई पाटील निलंगेकर ,ना.संजय बनसोडे- राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, विक्रम काळे शिक्षक आमदार, सुरजदादा चव्हाण कार्याध्यक्ष,राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस पार्टी आदी जण उपस्थित होते.

0 Comments