Latest News

6/recent/ticker-posts

कोविड योद्यांच्या विविध मागण्याचे ना.जयंत पाटील व ना.धनंजय मुंढे यांना निवेदन

कोविड योद्यांच्या विविध मागण्याचे ना.जयंत पाटील व ना.धनंजय मुंढे यांना निवेदन 


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) आज शुक्रवारी निलंगा येते शहरातील वृंदावन मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीला पक्षाचे वरिष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील व सामाजिक न्याय मंत्री धंनजयजी मुंढे, राज्यमंत्री संजयजी बनसोडे, महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष रूपाली चाकणकर व युवती प्रदेश अध्यक्ष सक्षना सलगर व युवक प्रदेश अध्यक्ष महेबूब भाई शेख हे सर्व जण निलंगा आले असता उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथील कोविड-19 अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांना कोविड योध्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. कोविड योद्यांनी निवेदनात म्हटले आहे की साहेब आम्ही कोविड -19 सारख्या संसर्गजन्य रोगांच्या परिस्थितीत मागील 1 वर्षांपासून कोविड बाधित रुग्णांची सेवा अहोरात्र करत आहोत साहेब आम्ही कधी आमच्या जीवाची  पर्वा केली नाही आमचं भविष्य काय होईल याच कधी विचार केलो नाही कोविड-19 सारख्या आजारामुळे  कोविड बाधित रुग्णाच्या जवळ कोणीही यायला तयार नव्हते त्या परिस्थितीत आम्ही आमच्या  जीवाचा कधी विचार केलो नाही. साहेब आम्ही या महामारीच्या संकटात केलेल्या सेवेचा विचार करून आपण महाराष्ट्रातील सर्व कोविड योध्याना शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशा मागण्याचे निवेदन कोविड योद्या तर्फ देण्यात आले आहे. यावेळी रामदास सोमवंशी , इरफान शेख , मीना ढगे , अभिजित सूर्यवंशी , पुजा कदम , अनतेश्वर जाधव , सुरवसे संकेत , विजय घाडगे , भोसले सुमित , गोवर्धन जाधव , अर्जुन कुमठे , आशिष माने , अलगुडे मदार , मुजीब नासरजंग , श्रीमंगले पल्लवी , मेघा सूर्यवंशी , निर्मला कांबळे ,पुथ्वी श्रीमंगले , राजनंदनी गायकवाड , विशाखा हातागळे , दीपाली सूर्यवंशी , गीता खंडागळे , रोहिणी जाधव , गोपाळ जाधव , विजय चव्हाण , परमेश्वर श्रीमंगले , रामेश्वर श्रीमंगले , सुमित आपेट आदी जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments