15 ते 20 फूट उंचीचे पिंपळाचे वृक्ष मोडले, विद्युत पुरवठाचे मीटर फोडले;अज्ञाताविरुद्ध भादा पोलिसांत गुन्हा
बी डी उबाळे
औसा:"शासन सध्या झाडे लावा झाडे जगवा" या राष्ट्रीय कार्यक्रमावर कोट्यावधी रुपयांचा खर्च करींत असतानाच भादा तालुका औसा येथे वृक्ष लागवड केलेल्या विषयी किती नागरिक जागरूक आहेत याचे उदाहरण देता येईल. कारण या ठिकाणी लावलेल्या मोठ्या आणि शुद्ध हवा देणाऱ्या बोधिवृक्ष तथा पिंपळवृक्ष याचे अज्ञात माथेफिरुनी नुकसान केल्याने भादेकराकडून त्या माथेफिरू विरुद्ध मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. औसा तालुक्यातील भादा येथे पंधरा ते वीस फूट उंचीचे पिंपळाचे वृक्ष तोडून अंगणवाडीच्या वीजपुरवठा मीटरचे अज्ञात व्यक्तीने नुकसान केले असून त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की,भादा येथील वरवडा रोड वरील अंगणवाडी क्रमांक 04 या अंगणवाडी समोर गेल्या दोन वर्षापूर्वी पिंपळ या वृक्षाची लागवड करण्यात आली होती त्या ठिकाणी पाणी घालून तो वृक्ष अंगणवाडीकडून चांगल्या पद्धतीने जोपासला होता परंतु रविवारी दि 20जून 2021 रोजी रात्री अज्ञात व्यक्तीने तो 15 ते 20 फूट उंचीचा पिंपळवृक्ष वय वर्ष पाच याचे मोडून नुकसान केले असून अंगणवाडीसाठी वीजपुरवठा असलेले वीज वितरण कंपनीचे मीटर याची ही तोडफोड केली आहे. यामुळे भादा ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी माणिक सूर्यवंशी यांनी शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या त्या माथेफिरु आणि अज्ञात मानव प्राण्याविरुद्ध भादा पोलिसात गुन्हा नोंद केला असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी यांनी दिली.
याच अंगणवाडीसाठी मागील चार ते पाच वर्षापासून वाल कंपाऊंड आणि लहान मुलांना खेळण्यासाठी ग्राउंडची मागणी नागरिकाकडून वारंवार होत असताना संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याची नागरिकांत तीव्र संताप आसून ते कंपाउंड न झाल्यानेच या ठिकाणी असे लहान-मोठे सतत अज्ञातांकडून नुकसान केली जात असल्याची चर्चा गावात आहे.
0 Comments