22 दिवसापासून काळेगाव अंधारात, वीज पुरवठा सुरळीत न केल्यास उपोषणाचा इशारा
अहमदपुर:(प्रतिनिधी) दि.१८-काळेगाव ता अहमदपुर येथे गेल्या बावीस(22) दिवसापासून विधुत पुरवठा बंद आहे.डि पी जळाली आहे वारंवार संबंधित अधिकारी, कर्मचारी ला सांगुन सुध्दा कुठली ही दखल घेतली नाही सर्व गावकरी ने दोन दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही तर महावितरण कार्यालय समोर 21/06/2021 सोमवारी लाक्षणिक उपोषण करणार आहेत असे काळेगाव चे उपसरपंच शुकुर जागीरदार,ग्राम पंचायत सदस्य यशवंत केंद्र,सय्यद मुख्तार ,शेख खैसर, सय्यद जाफर, सय्यद यादुल, महेश जाधव, सय्यद फय्याज,बिलाल जागीरदार, सय्यद इद्रिस,सय्यद अक्रम, केंद्र गजानन, सय्यद मुसतजीब,अदी गावकरी ने इशारा दिला आहे.

0 Comments