Latest News

6/recent/ticker-posts

कासार शिरशी पोलीस स्टेशन मध्ये मान्यवरांच्या उपस्थित वृक्षारोपण

कासार शिरशी पोलीस स्टेशन मध्ये मान्यवरांच्या उपस्थित वृक्षारोपण


निलंगा:(प्रतिनिधी/फिरोज जागीरदा) निलंगा तालुक्यातील कासार शिरशी येथे पुणे येथील शांतिदूत परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा सौ.विद्या ताई जाधव यांच्या संकल्पनेनुसार या सेवाभावी संस्थेचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष प्राध्यापक जीवन जाधव यांच्या प्रमुख उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक शांतिदूत परिवाराची मार्गदर्शक डॉक्टर विठ्ठल राव जाधव यांच्या हस्ते येथील पोलीस स्टेशन परिसरात अनेक मान्यवरांच्या उपस्थिती वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी पोलीस स्टेशन व ग्रामस्थांच्यावतीने जाधव यांचा सत्कार करण्यात आला. पुणे येथील शांतिदूत परिवाराच्या वतीने सबंध देशभर विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या या सेवाभावी संस्थेच्या मराठवाडा विभागीय पातळीवर कार्य करणाऱ्या संस्थेच्या वतीने लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशन मध्ये वृक्षारोपण करण्यात येत आहे. या उपक्रमाची माहिती प्राध्यापक जाधव यांनी येथील पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण समारंभात प्रास्ताविक भाषणात दिली ते म्हणाले की ही संस्था सर्वधर्म समभाव धार्मिक सलोखा सामाजिक शांतता वृक्षारोपण मानवसेवा गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदत दिव्यांगांना सहकार्य रक्तदान शिबिरे अशा अनेक माध्यमातून कार्य करत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे नागरिकांच्या सहकार्यातून यापुढे रक्तदान शिबिर दिव्यांग व्यक्तीला मदत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांचे वाटप असे अनेक उपक्रम राबवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला याप्रसंगी येथील माजी सरपंच संजय बोला अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष जिलानी बागवान सरपंच प्रतिनिधी मोनेश्वर पांचाळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सेवानिवृत्त पोलीस महासंचालक डॉक्टर जाधव म्हणाले की पृथ्वीवरील पर्यावरणाची संतुलन कायम राखण्यासाठी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन याशिवाय आता पर्याय नाही यासाठी वृक्ष लागवड हि लोकचळवळ बनवणे काळाची गरज आहे असे सांगून त्यांनी वृक्षसंवर्धना वर भर दिला येथील एपीआय रेवनाथ डमाळे यांनी पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून येथील पोलीस वसाहतीमध्ये घनदाट वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे सांगून लावण्यात आलेल्या सर्व वृक्षांच्या संवर्धनाची हमी त्यांनी दिली तर येथील उमरगा रोडवर उद्धव टेकडीला दोनशे वृक्षांची लागवड करून हे ठिकाण आकर्षक बनवणार असल्याची माहिती पत्रकार श्याम मुळेच कर यांनी दिली तर ग्रामपंचायतीच्या वतीने सोनामाता च्या डोंगर पायथ्याला वृक्षारोपण करणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य कोकणे यांनी दिली याप्रसंगी ज्ञानेश्वर म डोळे जिलानी बागवान यांची भाषणे झाली

Post a Comment

0 Comments