Latest News

6/recent/ticker-posts

युवकांच्या पुढाकाराने अनेक वर्षांपासून मुस्लिम स्मशानभूमीचा प्रश्न लागला मार्गी

युवकांच्या पुढाकाराने अनेक वर्षांपासून मुस्लिम स्मशानभूमीचा प्रश्न लागला मार्गी


शेख बी जी

औसा: दि.२७ - औसा तालुक्यातील मौजे भादा येथील स्मशानभूमीचा प्रश्‍न अनेक वर्षापासून खूप त्रासदायक झाला होता.तो युवकांच्या पुढाकाराने मार्गी लागला आहे. मुस्लिम समाजाच्या कब्रस्ताना च्या जागेसंदर्भात येथील दोन गटांमध्ये एकुण क्षेत्रफळाच्या बाबतीत वाद होता.दोन्ही बाजूकडील वादी प्रतिवादी पैकी एक, दोन मयत झाले.मात्र प्रश्न मार्गी लागण्याचे चिन्ह दिसेनात बऱ्याच वेळेला व गावातील पुढाऱ्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले, त्यांनाही या कामी यश आले नाही.वयस्क  मंडळींना थोडसं बाजूला ठेवून दोन्ही गटातील युवकांनी पुढाकार घेऊन कमी ,अधिक क्षेत्रफळात तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला. मागील दोन वर्षांपूर्वी कब्रस्तानाच्या संरक्षक भिंतींचे कामही करण्यात आले होते. मात्र यावरही अनेकांनी आक्षेप घेऊन काम रेंगाळत ठेवले होते. जुल्फेखार शेख यांनी व फारुख पठाण या दोन युवकांना  गावातील युवा मंडळीनी साथ दिली व संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले. उपसरपंच बालाजी शिंदे यांनी या कामी मोलाचे सहकार्य केले.त्यांच्या प्रयत्नांमुळेच संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले. विकास कामात युवकांनी पुढाकार घेतल्यास काय घडू शकते?याचे ताजे उदाहरण गावामध्ये दिसून येत असल्याने आनंदाचे वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments