Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची अघोषित आणीबाणी च्या निषेधार्थ जनजागरण आंदोलन

निलंगा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची अघोषित आणीबाणी च्या निषेधार्थ जनजागरण आंदोलन


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते मा.राहुलजी गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा.अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या सूचनेवरून आज दि. 26 रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जयंती साजरी केली. ओबीसी राजकीय आरक्षण रद्द केलेले आहे यासाठी केंद्र सरकारने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात झालेले ओबीसी जनगणना तात्काळ जाहीर करून ओबीसी राजकीय आरक्षण लागू करून व तसेच मराठा समाजाच्या आरक्षनासाठी विशेष अधिवेशन बोलवून मान्यता घ्यावी.अशी मागणी करण्यात आली. केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल गॅस खाद्यतेलाच्या वाढीचा व शेतकरी विरोधी कायद्याचा काळी फिती लावून व केंद्र सरकार विरोधी घोषणा देऊन निषेध करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या शपथपत्राचे वाचन करण्यात आले. यावेळी हे आंदोलन काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा अशोकराव पाटील मित्र मंडळाचे अध्यक्ष दयानंद चोपणे,जि.प.सदस्य सुरेंद्र धुमाळ,मा.नगरसेवक अशोक शेटकार, युवक काँग्रेस चे सरचिटणीस अमोल सोनकांबळे,युवक काँग्रेस उपाध्यक्ष रमेश मोगरगे,सेवा दलाचे प्रमोद ढेरे,रोहन सुरवसे,सरपंच साहेबराव भोईबार, सरपंच हरिभाऊ बोळे, स्वरूप येळकर, सरपंच लिंबराज जाधव,महेश चिकराळे,संजय गांधी निराधार समितीचे सदस्य गोविंद सूर्यवंशी,मा.सभापती दिलीप हूलसुरे, मुन्ना सुरवसे,उत्तम माने,अजित बोळे, सोमनाथ कदम, अजय कांबळे,नागनाथ घोलप,दादाराव जाधव आदी पदाधिकारी व कार्यकते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments