Latest News

6/recent/ticker-posts

लिंबाळा येथे घरास लागलेल्या आगीत लाखाचे नुकसान

लिंबाळा येथे घरास लागलेल्या आगीत लाखाचे नुकसान


कासार शिरशी
:( प्रतिनिधी फेरोज जागीरदार ) लिंबाळा तालुका निलंगा येथील शेतकरी वसंतराव खांडेकर यांच्या घरात विजेच्या शॉर्टसर्किटने अचानक आग लागली या आगीत संसार उपयोगी सर्व साहित्याची होळी झाली यात एक लाख रुपयाचे नुकसान झाले. घडलेली आगीची घटना गुरुवार तारीख 24 रोजी सकाळी 8:30 वाजता घडली या घटनेची नोंद कासारशिरसी पोलीस स्टेशनला करण्यात आली असून तलाठी ग्रामसेवक व पोलिसांच्या वतीने स्थळ पंचनामा करण्यात आला या आगीत जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले पीडित कुटुंबास आर्थिक साह्य मिळावे अशी मागणी लिंबाळा ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments