ओबीसींचे राजकीय अस्तीत्व संपवण्याचा डाव हाणून पाडा- विनायकराव पाटील

चाकुर:( ता.प्र.सलीमभाई तांबोळी ) सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले ओबीसी आरक्षण हा न्यायालयाआडून ओबीसींचे राजकीय अस्तीत्व संपवण्याचा डाव आहे. ओबीसी एकजूटीतून तो हाणून पाडावा, अनेक ओ.बी.सी.नेत्यांनी हाणुन पाडण्यांचे आहवान विनायकराव पाटील यांनी केले. आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टी चाकुरच्या वतीने करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलन प्रसंगी ते बोलत होते. चाकुर शहरातील जुने बसस्थानक नगरपंचायत कमानी समोर रस्ता रोखो आंदोलन करण्यात आले. गणेशदादा हाके पाटील, बालाजी पाटील चाकुरकर,रोहिदास वाघमारे,वसंत डिगोळे,नितीन रेड्डी,सज्जन लोणाळे,शिवाजी बैनगीरे,अशोक चिंते,यांनी ओबीसी आरक्षणा बाबत आपले विचार व्यक्त केले.शहरात जवळपास दोन तास रस्ता रोखो आंदोलन करण्यात आला.अनेक वाहने रस्त्यावर उभी होती.प्रवाशांना दोन तास रस्त्यावर ताटकळत बसावे लागले.ओबीसीच्या आरक्षणा बाबत जोपर्यंत निर्णय लागत नाही तो पर्यत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करत राहु व ओबीसीना न्याय मिळुन दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.असे ते म्हणाले महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांनावर अन्याय होत आहे.तालुक्यात विमा मंजूर नाही.भाजपाच्या शासनकाळात आम्ही जवळपास पाशे कोटी रुपये विमा मतदारसंघात आणुन शेतकऱ्यांना न्याय दिला.आज पुर्ण मतदारसंघात विमा रक्कम फक्त अठरा लाख रुपये आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण नुकतेच रद्द केले आहे. यावरून ईतर मागासवर्गीय समाजात तीव्र नाराजीची भावना आहे. हे आरक्षण परत देण्यात यावे, या मागणीसाठी आज राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले होते. या अंतर्गत चाकुर येथील नगर पःचायत कमानी समोर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ओबीसी भाजपा असंख्य कार्यकर्ते आदिंसह बहुसंख्य ओबीसी पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी ऊपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले आरक्षण परत मिळविण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने शक्य ते सर्व प्रयत्न करावेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेली ओबीसी जनगणना तात्काळ करावी, अशी मागणी याप्रसंगी केली तर नितीन रेड्डी यांनी ओबीसींचे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे आरक्षण आवश्यक असल्याचे सांगीतले. ते न मिळाल्यास भविष्यात ओबीसींच्या भावनांचा ऊद्रेक होईल, असा ईशारा आंदोलन कर्यत्यांनी दिला यांनी दिला. जमुनाताई बडे साभापती प.स.चाकुर धनश्री अर्जुने जि.प.सदस्य , बाजार समिती सभापती प्रशांत पाटील ता.अध्यक्ष शिवाजीराव बैनगिरे, अशोकदादा चिंते, माजी. उपाध्यक्ष नितीन रेड्डी, सिद्धेश्वर पवार, शहराध्यक्ष प्रशांत बिबराळे हक्कानी सौदागर आदि उपस्थित होते.याचा निषेध नोंदवून आंदोलकांनी आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. सकाळी साडे दहा पासून साडे बारा वाजेपर्यंत हे आंदोलन चालल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, पोलिसांनी एसटी महामंडळाच्या बस बसस्थानकात थांबविल्या होत्या यामुळे प्रवाशांची तांराबळ उडाली. विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांना देण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
0 Comments