शिवसेनेच्या लातूर जिल्हा प्रमुख पदी मदनसुरीचे शिवाजीराव माने
मदनसुरी:(प्रतिनिधी/ द्रोणाचार्य कोळी) निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथील जुने शिवसैनिक शिवाजीराव माधवराव माने यांची शिवसेनेच्या लातूर जिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. लातूर बीड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार लातूर बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आले असून औसा, लातूर, निलंगा शहरासाठी मदनसुरीचे शिवाजीराव माने तर लातूर ग्रामीण,चाकूर,अहमदपूर उदगीर साठी बालाजी शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी शिवाजी माने यांनी शिवसेनेचे निलंगा तालुका प्रमुख म्हणून काम पाहिले होते. त्याच्या निवडीबद्दल निलंगा तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे.

0 Comments