जळगाव येथे ऑनलाइन प्रात्यक्षिकातुन योग दिन उत्साहात
जळगाव:( जिल्हा प्रतिनिधी/बी आनंदकुमार) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, शालेय शिक्षण विभाग जळगांव, जळगाव जिल्हा होगी योगा असोशिएशन यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित ७ वा आंतरराष्ट्रीय योग दिन २०२१ झूम मिटिंगने ऑनलाइन पध्दतीने साजरा केला गेला. आंतरराष्ट्रीय योग पंच व तज्ञ सचिव जळगाव, जिल्हा होशी योग असोशिएशन व महाराष्ट्र योग असोशिएशन च्या अध्यक्षा " डॉ. अनिता सतिश पाटील यांनी योगा प्रोटोकॉल राष्ट्रीय खेळाडू नंदिनी दुसानेच्या प्रात्यक्षिकासह करवून घेतला या ऑनलाईनआंतरराष्ट्रीय योग कार्यक्रमास अभिजीत राऊत जिल्हाधिकारी, जळगाव, डॉ. प्रविण मुंढे पोलिस अधिक्षक जळगाव, मिलिंद दिक्षित जिल्हा क्रिडा अधिकारी जळगाव,डॉ. बी. एन. पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. जळगाव, सतिश कुलकर्णी, आयुक्त म.न.पा. जळगाव' भास्कर पाटील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.पं. जळगाव, भाऊसाहेब अकलाडे शिक्षणाधिकारी (प्राथमिक जि.प. जळगाव यांची ऑनलाईन उपस्थिती होती. सुजाता चव्हाण तालुका क्रीडा अधिकारी जळगाव यांनी सूत्रसंचालन केले व जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कोरोना सारख्या महामारीच्या काळात निरंतर योगाभ्यास किती आवश्यक आहे. या विषयी म.न.पा. आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी याविषयी मार्गदर्शन केले. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी योगाभ्यास ही निरंतर प्रक्रिया प्रत्येकाने आत्मसात करावी तसेच योग हा केवळ एक दिवसापूरता न राहता तो रोज व्हावा यासाठी प्रोत्साहन दिले. उपकार्यकारी अभियंता, जळगाव ग्रामिण उपविभाग सतिश पाटील यांनीही कर्यक्रमास सक्रिय सहभाग नोंदविला तांत्रिक बाबीसाठी इशी, सुशिल तलवेलकर व आदित्य दुसाने यांचे सहकार्य लाभले.
0 Comments