टिप्परची दिशा चुकवायला जाऊन निटूर मोड जवळ कारचा अपघात पाच जण जखमी
के वाय पटवेकर
निटूर: आज सायंकाळी 5:00 च्या सुमारास निटूर मोड जवळ कार पलटी होऊन अपघातात पाच जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. निलंगा तालुक्यातील निटुर मोड जवळील एचपी पेट्रोल पंपाच्या बाजूला समोरून येणाऱ्या वेगवान टिपला चुकवण्यासाठी बाजूला घेतलेल्या चारचाकी कारचा रोड वरून खड्ड्यात पडून मोठा अपघात झाल्याची घटना आज सायंकाळी 5:00 वाजता निटुर(मोड) घडली आहे. ताजपुर गावचे पाच युवक हे निटुर मार्गे डांगेवाडी गावाच्या दिशेने जात असताना निटूर ते निटूर मोड एक किलोमीटरच्या अंतरात एचपी पेट्रोल पंपाच्या बाजूला रस्त्याच्या खड्ड्यात चारी टायर वर करून पडल्याने कारमधील पाच जण जखमी झाले आहेत. लातूर ते जहीराबाद महामार्ग बनवणाऱ्या कंपनीचे टिप्पर हे अतिशय वेगामध्ये या रस्त्यावरून धावत आहे समोरून येणाऱ्या वाहनधारकांना व्यवस्थित साईड ही देत नाही यामुळे वारंवार वाहनधारकांची तक्रार येत आहे. MH 12 QW 2096 या अपघात झालेल्या चार चाकी कारची नोंद निटुर येथील पोलीस चौकी मध्ये अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.
0 Comments