कासार सिरसी येथे उमेद अंतर्गत मनरेगातून महिला मंडळातील बचत गट पदाधिकाऱ्यांशी आ. अभिमन्यू पवार यांनी साधला संवाद
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) आज शनिवारी दि.19 रोजी सरस्वती मंगल कार्यालय कासार सिरसी येथे "उमेद अंतर्गत मनरेगातून महिला बचतगटांचा विकास" कार्यशाळेस औसाचे आमदार अभिमन्यू पवार उपस्थित राहून मंडळातील बचत गट पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी माता भगिनींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अनेक योजना राबविल्या असून जनधन योजनेच्या माध्यमातून त्यांनी 21 कोटींपेक्षा अधिक महिलांना बँकेशी जोडून घेतले, उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून 11 कोटींपेक्षा अधिक घरांमध्ये मोफत गॅस जोडणी देऊन महिलांची धुराच्या त्रासातून मुक्तता केली असल्याची माहिती यावेळी आ.अभिमन्यू पवार यांनी दिली.पुढे बोलताना आ.पवार म्हणाले मनरेगातून ग्रामविकास हे अभियान मी मतदारसंघात राबवत असून तुम्हालाही या अभियानाशी जोडून घेण्यासाठी इथे आलो असल्याचे सांगून '25 बचत गटांनी एकत्र येऊन 250 महिलांनी मिळून 100 एक्कर जमिनीवर फळबाग लागवड करावी, मी स्वतः पुढाकार घेऊन तुम्हाला अनुदान मिळवून देईन असे आश्वासन आ.पवार यांनी केले व बचत गटाच्या महिलांच्या नावे फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून देईन व तुमच्या कंपनीला चांगल्या मार्केटशी जोडून सुद्धा देईन. फळबाग लागवडीसाठी खड्डे खांदण्यापासून ते प्रत्येक कामासाठी अनुदान आहे. शेतजमीन सोडलं तर शून्य गुंतवणूक आणि लाखोंमध्ये फायदा असलेल्या योजनेचा लाभ घ्या" असे आवाहन आ.पवार यांनी केले.या कार्यक्रमाला उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक भगवान अंकुश, शरद सन्मुखराव, लेखाधिकारी मिलिंद अंबेकर, भाजप मंडळाध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, पं स सदस्य नारायण इंगळे, सौ शहाजहाँ बागवान, भाजप महिला मोर्चा मंडलाध्यक्षा सौ कल्पनाताई ढवीले, मंडळ उपाध्यक्षा सौ कविताताई गोरे, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष जिलानी बागवान, युवा मोर्चा मंडळाध्यक्ष परमेश्वर बिराजदार, सरचिटणीस धनराज होळकुंदे, प्रभाग समन्वयक लिम्बराज कुंभार, संतोष पालके, सौ उमा कोरे, नितीन रोडे, ग्रा.पं. सदस्य सौ साळूबाई कदम, सौ हैदरबाई धोते, अनिस बागवान, दीपक ढवीले, कृषी सहाय्यक चव्हाण, कृषी सखी, पशु सखी, सीटीसी सखी व कासार सिरसी मंडळातील महिला बचतगट पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments