पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात निलंग्यात काँग्रेसचे आंदोलन
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने सोमवार दिनांक 07 जून 2021 रोजी सकाळी 10:00 वाजता जाऊ पेट्रोल पंप लातुर रोड व गंगा पेट्रोल पंप बिदर रोड समोर केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढी विरोधात केंद्रातील मोदी सरकारचा तीव्र निषेध करून आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शासनाने कोरोनासंदर्भात घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून आंदोलन केले. यावेळी या आंदोलनकांच्या हातात लुटरे मोदी सरकार पेट्रोल हुवा 100 के पार, बहोत हुई महंगाई की मार अब बस कर यार, पेट्रोल डीझेल 100 पार मोदी बस करा जनतेची लूटमार, पेट्रोल मेहंगाई से जनता बेहाल मोदी के पुंजीपती मित्र मालामाल असे फलक होते गंगा पेट्रोल पंप वर काँग्रेसचे नेते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभय साळुंके, काँग्रेसचे शहराध्यक्ष गोविंद शिंगाडे, माजी न .प. सभापती तथा काँग्रेस अल्पसंख्याक विधानसभा अध्यक्ष असगर अन्सारी, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, पंचायत समिती सदस्य महेश देशमुख, माधवराव पाटील, गिरीश पात्रे, तुराब बागवान, लातुर रोड वरील जाऊ पेट्रोल पंप येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन केले.यावेळी दयानंद चोपणे, कदम, लाला पटेल,सिराज देशमुख,प्रकाश पाटके, सुर्यवंशी, महेश चिक्राळे, शेटकार अप्पा, सुरेंद्र धुमाळ, झरकर सर,दिलीप हुलसुरे, बालाजी मुगळे,अमोल सोनकांबळे,बालाजी भुरे, प्रसाद झरकर, अलीम सौदागर व आदी काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी आदिनी या आंदोलनात सहभाग घेऊन मोदी सरकारचा निषेध केला. कोरोना काळामध्ये सर्वसामान्यांच्या हाताला काम नाही, अनेकांचे रोजगार या कालावधीमध्ये गेले आहेत.याचा परिणाम सर्वच जनतेवर पडला आहे. त्यामध्ये केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ केली आहे. गॅस पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये वाढ केल्यामुळे सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत, या भाववाढीच्या विरोधात काँग्रेस कमिटीच्या वतीने इंधन दरवाढ कमी करावी यासाठी आंदोलन केले आहे.
0 Comments