Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली औसा नगरपरिषदेच्या विविध विकास कामाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा संपन्न

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली औसा नगरपरिषदेच्या विविध विकास कामाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा संपन्न


शेख बी जी

औसा: दि.२५ - गर परिषदेच्या आज विविध विकास कामाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील होते.या कार्यक्रमासाठी सामाजिक न्याय मंत्री.धनजंय मुंढे, पाणीपुरवढा राज्य मंत्री .संजय बनसोडे,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, किल्ला परिसर येथील नवीन जलकुंभ, तसेच बसस्थानका समोरील नूतन व्यापारी संकुलाचा लोकार्पण सोहळा आणि जमाल नगर तलाव सुशोभीकरण, मुक्तेश्वर तलाव सुशोभीकरण,तलावातील बोटींग सेवा आणि शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी औसा नगरीचे नगराध्यक्ष अफसर शेख ,उपनगराध्यक्ष जहाँअरा तत्तापुरे ,जि प सदस्य नारायण आबा लोखंडे ,माजी नगराध्यक्ष सुनील मिटकरी  ,नगरसेवक अंगद कांबळे ,जयराज कसबे, पंचायत समिती माजी सदस्य बसवराज धाराशिवे ,माजी उपनगराध्यक्ष संगमेश्वर ठेसे ,माजी नगराध्यक्ष सुरेश सूर्यवंशी माजी जि प सदस्य अमर बाबा भोसले ,युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष हणमंत राचेटी ,प्रणिल उटगे,युवक काँग्रेसचे सुरज बाबळसुरे, प्रशांत बिडवे ,श्याम भोसले ,राजेंद्र बनसोडे ,गुलाब शेख ,उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप भालेराव ,उमरगा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील ,धनाजी पवार उपस्थित होते आदी या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.राजु पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments