ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांच्या लेखणीतून...
,त्यांची अस्वस्थता आणखी वेदना देत होती..
जगी ज्यास कोणी नाही..

मागच्या आठवड्यात या तिन्ही पिलांची आई गेली..हसत खेळत एकेदिवशी पाठीतून वाकली आणि तिने प्राण सोडला..ही अनाथ झाली..माय जाण्याचे काय दुःख असते मी सहज पाहत होतो..मनातून वेदना होत होत्या,त्यांची अस्वस्थता आणखी वेदना देत होती..त्या तिन्ही पिलांचं एकमेकांशी सुरू असलेलं कुरवाळन जाणवत होतं..एकमेकांशी दुःख शेअर करत होते..प्राण्यांना इतकं प्रेम,माया,ममता कुठून आली असेल?या प्रश्नांनी मी हैराण झालो..आम्ही बोलणारी,भावना शब्दात व्यक्त करणारी धडधाकट माणसे असूनही आमच्यातील प्रेम कुठे आटले असेल..घराघरात निर्माण झालेल्या भिंती,म्हाताऱ्या झालेल्या आई वडिलांच्या आम्हीच केलेल्या वाटण्या,आई वडील गेल्यानंतर किमान 14 दिवस तरी पाळला जाणारा दुखवटा आम्ही कुठे विसरला आहे..अशी कोणती भानामती आमच्यावर केलीय की आमची मती त्यात गुंगून गेलीय..एकमेकाशी बोलता येत नसतानाही प्राणी जर आपल्या भावना व्यक्त करू शकत असतील तर आम्ही असे कसे झालो..अनेक प्रश्न या निमित्ताने मनात येऊन गेले..आईच्या आजाराचा खर्च कोण करायचा?हा प्रश्न ज्या घरात निर्माण होतो,त्या घरांना आपल्या आईचे नाव सांगण्याचा अधिकार नाही.. मी या कुत्र्यांना सॅल्यूट करतो,कारण त्यांना भावना आहेत..
संजय जेवरीकर{ ज्येष्ठ पत्रकार }
0 Comments