निमंत्रितांच्या उपस्थितीत औश्यात विकास कामांचे शुभारंभ व लोकार्पण सोहळा
शेख बी जी
औसा: दि.२५ - नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या तहसील जलकुंभ व साईट अँड सर्व्हिसेस आणि किल्ला परिसर येथील नवीन जलकुंभ तसेच बसस्थानकासमोरील नूतन व्यापारी संकुलाचा लोकार्पण सोहळा आणि जमाल नगर तलाव सुशोभीकरण, मुक्तेश्वर तलाव, सुशोभीकरण तलावातील बोटीन सेवा आणि शहरातील विविध ठिकाणी सुरू होत असलेल्या एक्वा वॉटर चा शुभारंभ दिनांक 25 जून 2019 रोजी सकाळी दहा वाजता राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष मा. ना.जयंत पाटील, यांच्या हस्ते तर राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. निमंत्रितांच्या उपस्थितीत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजनेसह जमाल नगर तलाव येथे आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव संजय शेटे , विक्रम काळे ,श्रीमती आशाताई भिसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रमास निमंत्रितांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्ष डॉ अफसर शेख, उपनगराध्यक्ष जहाआरा तत्तापुरे, बांधकाम सभापती सौ कीर्ती कांबळे,पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव आणि मुख्याधिकारी वसुधा फड यांनी केली आहे.

0 Comments