Latest News

6/recent/ticker-posts

वलांडी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रोपवाटिकेचे उदघाटन

वलांडी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रोपवाटिकेचे उदघाटन


महिला बचत गटाची जिल्ह्यातील पहिलीच हायटेक रोपवाटिका

के. वाय. पटवेकर

लातूर: वलांडी येथे उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत विठ्ठल रुक्मिणी स्वयंसहायता समूह चवनहिप्परगा समुहाने तयार केलेल्या जिल्ह्यातील पहिली महिला बचत गटाची उमेद हायटेक रोपवाटिका (नर्सरी)चे  जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वतः जिल्हाधिकारी यांनी वडाचे वृक्ष खरेदी करून नवीन रोपवाटिकाची पहीली खरेदी केली तसेच या उपक्रमाचे कौतुक करून महिला बचत गटांना प्रोत्साहित केले. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच VSTF चे नोडल अधिकारी उदयकुमार सोळूंखे, प्रकल्प संचालक संतोष जोशी, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सुरेश घोळवे, गट विकास अधिकारी मनोज राऊत, वलांडीचे सरपंच भंडारे तालुका अभियान व्यवस्थापक आर आर विडप, प्रभाग समन्वयक बेद्रे सिद्धार्थ, लता बोनाकृती ,सुखदेव मलवाड, राजेश बिरादार ,VSTF  तालुका समन्वयक सागर तापडिया ,विठ्ठल रुक्मिणी महिला स्वयं सहायता समूह चवनहिप्परगाचे अध्यक्ष मंगलबाई बिरादार , सचिव दीपाली बिरादार CRP हसीना शेख, लोंढे ताई, मुक्ता लोहार , सरस्वती गायकवाड, श्रीदेवी गायकवाड आदी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments