जातपात विरहित समाजकार्य करणार्या समता फाऊंडेशनकडून भव्य लसीकरण उत्सव
लातूर (प्रतिनिधी)- प्रसिद्ध उद्योगपती पुरुषोत्तम अग्रवाल यांनी समाजसेवेच्या क्षेत्रात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. १५ जूनपासून अग्रवाल यांच्या समता फाऊंडेशनकडून वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात कोविड लसीकरण उत्सवास सुरुवात झाली आहे. जातपात, धर्म असा भेदभाव न करता समता फाऊंडेशन समाजकायर्र् करीत आहे. लसीकरण उत्सवाचा कार्यक्रम हा असाच एक कार्यक्रम आहे. या लसीकरण उत्सवात लोक गर्दी करत आहेत. आतापर्यंत १४ हजार लोकांनी या उत्सवात लस घेतली आहे. येत्या ८-१० दिवसात ३० हजार नागरिकांना लस देण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. या लसीकरण उत्सवात रिसोड नगर परिषद, वाशिम जिल्हा परिषद, रिसोड तालुका पत्रकार संघ, ग्रामीण पत्रकार संघ, सिटी केअर हॉस्पिटल यांचा सहभाग दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाचे आवाहन केले आहे. या लसीकरणास समता फाऊंडेशनने प्रतिसाद दिला आहे. पंतप्रधानाच्या आवाहनास प्रतिसाद देऊनच समता फऊंडेशनने १५ जूनपासून लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला असून त्यास मिळणारा प्रतिसाद नजरेत भरणारा आहे. सध्या समता फाऊंडेशनने आयोजिलेल्या लसीकरण उत्सवाची संपूर्ण राजयात जोरदार चर्चा सुरु आहे. प्रसिद्ध उद्योगपती पुरुषोत्तम अग्रवाल यांनी समता फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या संस्थेने आतापर्यंत जे सामाजिक कार्य केले ते खरोखरच उल्लेखनीय कार्य आहे. या कार्याला तोड नाही, अशी चर्चा जनतेत सुरु आहे.
समता फाऊंडेशनने आता पर्यंत कैद्यांना प्रशिक्षण, मुलांना संगणक प्रशिक्षण, माता संगोपन, महिलांना व्यवसाय शिक्षण, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे वाटप, प्रौढ शिक्षण, सामूहिक विवाह, फॅमिली प्लॅनिंग शस्त्रक्रिया, आरोग्य केंद्रांना मदत असे विविध प्रकारचे सामाजिक कार्य संस्थेकडून सुरु आहे. या कार्याची दखल राज्याने घेतली आहे या कार्यांची प्रशंसा होत आहे.


0 Comments