निटूर ग्रामपंचायतीचा विद्युत अभावी पाणीपुरवठा झाला विस्कळीत;विजयकुमार यांनी आपल्या विंधन विहिरी द्वारा पाणी देऊन केला सुरुळीत
प्रा. बी. जी. शेख
लातूर: निलंगा तालुक्यातील निटूर तेथे मागील पाच दिवसांपासून पाण्यासाठी नागरिक वणवण फिरत असल्याने गावात पाण्यासाठी भटकंती वाढल्याचे पाहून येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा पञकार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या शेतातील बोअरव्दारे मोफत पाणीपुरवठा करण्याचा संकल्प हाती घेतल्याने त्यांचे सर्वञ कौतुक होत आहे. दरम्यान,ताजपूर येथील पाझर तलावाव्दारे निटूर गावातील सार्वजनिक टाकीव्दारे पाणीपुरवठा नळाव्दारे केला जात असे माञ,मागील पाच दिवसापासून विज-महावितरणाने थकबाकीपोटी विज-बिल थकल्याने त्याचे कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे निटूर येथे पाण्यासाठी गांवकरी भटकंती करत असल्याचे पाहून येथील पञकार विजयकुमार देशमुख यांनी गावात दवंडी देऊन आपल्या शेतातील बोअरव्दारे पाणीपुरवठा सर्वसामान्य जनतेसाठी मोफत देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे कांही प्रभागातील नागरिक पाण्यासाठी येत आहेत. पञकार विजयकुमार देशमुख यानी सामाजिक भान ठेवून ह्या मोफत पाणीपुरवठ्याचा संकल्प हाती घेऊन सर्वसामान्यांसाठी आपला बोअर खुला केला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. पाणीधारक त्यांची कार्याची प्रशंसा करून त्यांना धन्यवाद देत आहेत. गावातील पाणी प्रश्नांचा वाली कोण ? असा सवाल जाणकार आतून विचारला जात आहे. गांवकर्यांसाठी पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा,अशी मागणी जोर धरित आहे. एकंदर निटूर गावाच्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधीचे अद्यापही लक्ष नसल्याने सर्वसामान्य जनता होरपळली जात असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
0 Comments